दरदिवशी आठ शेतकरी लावतात गळ्याला फास, दहा महिन्यांत २,४१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले

By अतुल कुलकर्णी | Published: November 23, 2017 06:40 AM2017-11-23T06:40:52+5:302017-11-23T06:41:26+5:30

मुंबई : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतक-यांनी आत्महत्या करू नयेत, म्हणून राज्य सरकारने कर्जमाफी देऊ केली असली, तरी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही.

Eight farmers die on hunger every day, 2,414 farmers die in ten months | दरदिवशी आठ शेतकरी लावतात गळ्याला फास, दहा महिन्यांत २,४१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले

दरदिवशी आठ शेतकरी लावतात गळ्याला फास, दहा महिन्यांत २,४१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले

googlenewsNext

मुंबई : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतक-यांनी आत्महत्या करू नयेत, म्हणून राज्य सरकारने कर्जमाफी देऊ केली असली, तरी राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. दरदिवशी आठ, याप्रमाणे गत दहा महिन्यांत २,४१४ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतीवर आलेली नापिकी, बी-बियाण्यांवरील वाढता खर्च, शेतमालाचे पडलेले भाव, घटलेली उत्पादकता आणि त्यातून आलेला कर्जबाजारीपणा, या कारणांस्तव शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. राज्य सरकारने जुलै महिन्यात कर्जमाफीची घोषणा केली. मात्र त्यानंतर, आॅगस्ट, सप्टेंबर ते आॅक्टोबर या काळात ७८८ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.
सहा महसूल विभागीय कार्यालयांतील आकडेवारीनुसार जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांत राज्यातील २,४१४ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. पैकी १,२७७ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना सरकारी मदत मिळाली आहे. उर्वरित ११३७ शेतकºयांची आत्महत्या शासकीय निकषांस पात्र ठरलेल्या नाहीत. अर्थात, त्यांनी कर्जबाजारीपणा वा नापिकीमुळे नव्हे, तर अन्य कारणांनी मृत्यूला कवटाळले, अशी सरकारची माहिती आहे.
>अधिकारी काम करायला तयार नाहीत
शेतकºयांना आर्थिक दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी सरकारला उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची स्थापना केली. मात्र, आपण सुचविलेले उपाय व दिलेल्या दिलेले
सल्ले शासकीय अधिकाºयांनी केराच्या टोपलीत टाकले. सगळी यंत्रणा सडलेली आहे. अधिकारी जमिनीवर काम करायलाच तयार नाहीत. सरकारच्या चांगल्या योजना हाणून पाडणाºया अधिकाºयांची जोपर्यंत हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आत्महत्या थांबणार नाहीत, असे उद्वेगजनक मत या मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
मागच्या वर्षी रोज सरासरी ६ शेतकरी आत्महत्या करत होते. या वर्षी ते प्रमाण ८ वर गेले आहे, यावरून सरकारचा कृषी विकासाचा दावा किती फसवा आहे, हे दिसून येते. कर्जमाफी मिळाली नाही, उलट सक्तीची वीजबिलाची
वसुली चालू आहे.
- धनंजय मुंडे, विरोधीपक्ष नेते, विधानपरिषद
सरकार जोपर्यंत धोरणांमध्ये बदल करत नाही, तोपर्यंत आत्महत्यांचे सत्र थांबणार नाही. मुख्यमंत्री एकटे काही चांगले करतील, असे म्हणून सगळी बोटे त्यांच्याकडे दाखवून काहीही साध्य होणार नाही.
-किशोर तिवारी, अध्यक्ष, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन
शेतकºयांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यास हे सरकार कमी पडले. आपले कोणीच नाही असे वाटून शेतकºयांनी हा पर्याय निवडला. सदाभाऊ खोत मंत्री झाले, पण ते काहीही करू शकले नाहीत.
- खा. राजू शेट्टी,
शेतकरी संघटना

Web Title: Eight farmers die on hunger every day, 2,414 farmers die in ten months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.