लोहमार्ग पोलिसांना आता आठ तास ड्युटी; प्रायोगिक तत्वावर झाली सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 02:07 AM2019-11-02T02:07:09+5:302019-11-02T02:07:26+5:30

पारसिक बोगद्याच्या सुरक्षेची जबाबदारी यापूर्वी मुंबई लोहमार्ग पोलिसांकडे होती.

Eight-hour duty to the highway police; The experiment started on an experimental basis | लोहमार्ग पोलिसांना आता आठ तास ड्युटी; प्रायोगिक तत्वावर झाली सुरुवात 

लोहमार्ग पोलिसांना आता आठ तास ड्युटी; प्रायोगिक तत्वावर झाली सुरुवात 

googlenewsNext

ठाणे/डोंबिवली : मध्य आणि हार्बर या रेल्वे स्थानकांपैकी नेहमीच गर्दी होणारे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुर्ला, ठाणे , डोंबिवली आणि कल्याण येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिवाळीनंतर आठ तास ड्युटीची अनोखी अशी दिवाळी भेट दिली आहे. यामुळे कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. १ नोव्हेंबर म्हणजे शुक्रवारपासून प्रायोगिक तत्वावर पोलीस कर्मचाºयांचे आठ तासांचे शेड्युल सुरू झाले असून हा फॉर्मुला इतर लोहमार्ग पोलीस ठाण्यातही लवकर राबवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोहमार्ग पोलीस आयुक्त म्हणून रूजू झाल्यावर रवींद्र सेनगावकर यांनी लोहमार्ग पोलिसांची बिघडलेली इमेज सुधारण्यासाठी काही धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यातच, त्यांनी आणखी एक धाडसी निर्णय घेऊन लोहमार्ग पोलीस कर्मचाºयांची आठ तासांची ड्युटी करण्यामार्फत निर्णय घेतलाच नाही त्याची अंमलबजावणी १ नोव्हेंबर पासून सुरू ही केली आहे. त्यासाठी त्यांनी गर्दी होणारे चार रेल्वेस्थानकावरील पोलीस ठाण्याची निवड केली आहे. यामध्ये कुर्ला, त्यानंतर ठाणे, डोंबवली आणि कल्याण या लोहमार्ग पोलीस ठाण्याचा समावेश आहे. यासंदर्भात ३१ ऑक्टोबर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बैठक बोलवून त्यांनी आठ तासांचे शेड्युल तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असून त्यानुसार सहा ते दुपारी २ आणि २ ते १० आणि १० ते सहा अशा ड्युटीचे तीन शेड्युल तयार केले आहे. पण, या शेड्युलनुसार दिलेल्या टाईममध्ये कर्मचाºयांनी हजर राहणे बंधनकारक आहे. जो कोणी दिलेल्या वेळेत हजर न राहिल्यास त्या कर्मचाºयांवर थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

पारसिक बोगद्याची जबाबदारी ठाण्याकडेच
पारसिक बोगद्याच्या सुरक्षेची जबाबदारी यापूर्वी मुंबई लोहमार्ग पोलिसांकडे होती. मात्र,गेल्या काही महिन्यांपूर्वीच ही जबाबदार मुंबई ऐवजी ठाणे लोहमार्ग पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे तेथील सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन शीपमध्ये १२ पोलीस तैनात करावे लागत असल्याने आणि त्यातच कमी मनुष्यबळ आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांसमोर या नवीन शेड्युलमुळे कर्मचाºयांच्या कमतरतेचा प्रश्न उभा राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हद्द अवाच्यासव्वा अशाच
ठाणे लोहमार्ग पोलिसांची हद्द तीन मार्गांवर पसरली आहे. त्यामुळे पोलिसांनी खुपच फरफट होत आहे. त्यातच मंजूर पदांपेक्षा कर्मचाºयांची संख्या कमी आहे. सद्यस्थिती कामकाज सुरू असून नवीन शेड्युलमुळे कर्मचारी संख्या वाढवणे काळाची गरज होऊन बसली आहे. तर कल्याण व डोंबिवली पोलीसांची हद्दही प्रत्येकी दोन-दोन मार्गांवर लांबपर्यंत पसरली आहे. तेथेही ठाण्यासारखी कर्मचाºयांची अवस्था आहे. मात्र, दुसरीकडे कुर्ला हे येथे पुरेसे मनुष्यबळ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सुरुवातीला चार पोलीस ठाण्याची निवड करून तेथे प्रायोगिक तत्त्वावर आठ तासांच्या ड्युटीचा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यातून समोर येणाºया अडीअडचणी व त्रुटी सोडवून लवकरच इतरही पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांसाठी आठ तासांची ड्युटी सुरू केली जाणार आहे. - रवींद्र सेनगांवकर, आयुक्त, लोहमार्ग पोलीस, मुंबई

कर्मचाऱ्यांना आठ तर अधिकाऱ्यांना बारा तास ड्युटी
१ नोव्हेंबर पासून लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांची ड्युटी आठ तास झाली आहे. मात्र, दुसरीकडे अधिकाºयांच्या ड्युटीचा टाईम बारा तास ठरवल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे हा आठ तासांचा प्रयोग किती यशस्वी होईल हे येत्या काळातच समोर येईल. अधिकाºयांची ड्युटीही आठ तासांची व्हावी अशी मागणी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही,अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Eight-hour duty to the highway police; The experiment started on an experimental basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.