भुसावळ स्थानकावर दररोज आठ तासांचा मेगाब्लॉक : अमरावती-मुंबई एक्स्प्रेस १५ दिवस रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 07:31 PM2019-04-04T19:31:10+5:302019-04-04T19:33:44+5:30

भुसावळ रेल्वे स्थानकावर विविध कामे पूर्ण करण्यासाठी दररोज तब्बल सहा ते आठ तासांचा मेगाब्लॉक राहील.

Eight hours mega block per day at Bhusaval station: Amravati-Mumbai Express canceled for 15 days | भुसावळ स्थानकावर दररोज आठ तासांचा मेगाब्लॉक : अमरावती-मुंबई एक्स्प्रेस १५ दिवस रद्द

भुसावळ स्थानकावर दररोज आठ तासांचा मेगाब्लॉक : अमरावती-मुंबई एक्स्प्रेस १५ दिवस रद्द

Next

-  गणेश वासनिक
अमरावती -  भुसावळ रेल्वे स्थानकावर विविध कामे पूर्ण करण्यासाठी दररोज तब्बल सहा ते आठ तासांचा मेगाब्लॉक राहील. त्यामुळे नागपूरहून बडनेरामार्गे भुसावळकडे ये-जा करणा-या बहुतांश रेल्वे गाड्या ५ एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यात अमरावती-मुंबई, अमरावती-सुरत, अमरावती-पुणे (वातानुकूलित), भुसावळ-गोंडवाना आदी प्रमुख रेल्वेगाड्यांचा समावेश आहे.

उन्हाळ्यातील सुट्यांमध्ये लग्नप्रसंग, सहलीकरिता बाहेरगावी जाण्याचे बेत आखले जात असतानाच रेल्वे विभागाने गुरुवारी रद्द होणाºया गाड्यांची यादी जाहीर केली. भुसावळ रेल्वे स्थानकाहून नागपूर, मुंबई, हावडा, अलाहाबादमार्गे ये-जा करणाºया या गाड्या ५ ते २० एप्रिल दरम्यान रद्द केल्या आहेत. भुसावळ रेल्वे स्थानकावरील यार्डचे नूतनीकरण, नवीन प्लॅटफार्म आणि तिसरा लोहमार्ग निर्मितीचे कार्य हाती घेतल्याने दरदिवशी आठ तासांचा मेगाब्लॉक राहील. 
 
अंबा एक्स्प्रेसला फटका 
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीत पश्चिम विदर्भातील प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेस (१२११२), अमरावती-सुरत एक्स्प्रेस (१९०२६), अमरावती-पुणे (वातानुकूलित) एक्स्प्रेस (२२११८), भुसावळ-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस (१२४०५), हावडा-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस (२२१२१), पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस (१२८४३), हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस (१२८३३) या गाड्यांचा समावेश आहे. भुसावळ रेल्वे स्थानकाहून जाणाºया हॉलिडे स्पेशल सहा गाड्यांच्या फेºया २० एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. 
 
पॅसेंजर गाड्यादेखील रद्द
भुसावळ-नागपूर, अमरावती-भुसावळ, नरखेड-भुसावळ, वर्धा-भुसावळ, मुंबई-भुसावळसह मुंबई-भुसावळ-नागपूर दरम्यान धावणाºया जवळपास ३६ पॅसेंजर गाड्यांच्या फेºया रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गरीब, सामान्य प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे. 
 
भुसावळ रेल्वे स्थानकावर विविध कामांसाठी तब्बल १५ दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे अमरावतीहून भुसावळ मार्गे जाणाºया सर्वच गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात अमरावती-मुंबई एक्स्प्रेसचा समावेश आहे. रेल्वे विभागाने रद्द होणाºया गाड्यांची यादी जाहीर केली आहे.
      - शरद सयाम, मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक, बडनेरा

Web Title: Eight hours mega block per day at Bhusaval station: Amravati-Mumbai Express canceled for 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.