पोलिसांच्या ‘आठ तास सेवे’ची वर्षपूर्ती
By admin | Published: May 6, 2017 06:37 AM2017-05-06T06:37:01+5:302017-05-06T06:37:01+5:30
देवनार पोलीस ठाण्यापासून सुरुवात केलेल्या पोलिसांच्या ८ तास सेवेला एक वर्षपूर्ण झाले आहे. वर्षभरात पोलिसांना ८ तास सेवेचा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देवनार पोलीस ठाण्यापासून सुरुवात केलेल्या पोलिसांच्या ८ तास सेवेला एक वर्षपूर्ण झाले आहे. वर्षभरात पोलिसांना ८ तास
सेवेचा प्रयोग यशस्वी पार पाडल्यामुळे सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत
आहे.
पोलीस आयुक्त पडसलगीकर यांच्यासह सहआयुक्त देवेन भारती आणि अप्पर पोलीस आयुक्त लख्मी गौतम यांनी देवनार पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावत पोलीस दलाकडून समाधानी असल्याचे मत व्यक्त
केले.
मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात पोलिसांना ८ तास सेवा देण्याचा मानस पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार मुंबईतील देवनार पोलीस ठाण्याच्या रवींद्र पाटील यांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यात पोलिसांच्या आठ तास डयुटी कशी करता येऊ शकते याची एक प्रतिकृती तयार केली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी मार्च महिन्यापासून हा प्रस्ताव प्रायोगित तत्वावर राबविण्यास मंजूरी दिली. मे महिन्यापासून देवनारसह काही पोलीस ठाण्यात आठ तासांची ड्युटी सुरू करण्यात आली.
कामकाज सुरळीत चालत असल्याचे लक्षात येताच अन्य पोलीस ठाण्यांनीही हा उपक्रम राबविण्यात आला. देवनार
पोलीस ठाण्यापासून सुरुवात करण्यात आलेल्या या प्रयत्नांना एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच मुंबईच्या सर्व पोलीस ठाण्यात ८ तास सेवा सुरु करण्यात येणार आहे.