‘वडाप’ खड्ड्यात कोसळून आठ जखमी !

By Admin | Published: August 30, 2016 08:43 PM2016-08-30T20:43:57+5:302016-08-30T20:47:25+5:30

पांचगणीहून महाबळेश्वरला विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली वडाप जीप अवकाळी गावच्या हद्दीत रस्त्याकडेच्या वीस फूट खड्ड्यात जाऊन पलटी झाली. यात जीप चालकासह

Eight injured in 'Vadap' collapsing | ‘वडाप’ खड्ड्यात कोसळून आठ जखमी !

‘वडाप’ खड्ड्यात कोसळून आठ जखमी !

googlenewsNext
dir="ltr">
आॅनलाईन लोकमत
 
महाबळेश्वर (सातारा), दि. 30 - पांचगणीहून महाबळेश्वरला विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली वडाप जीप अवकाळी गावच्या हद्दीत रस्त्याकडेच्या वीस फूट खड्ड्यात जाऊन पलटी झाली. यात जीप चालकासह आठ विद्यार्थी जखमी झाले. जखमींना येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असून तीन विद्यार्थ्यांना वाईच्या खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. 
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर तालुक्यातील टेकवली येथील गणपत वागळे यांची वडाप जीप आहे. ते या जीपमधून महाबळेश्वरच्या विद्यार्थ्यांना पांचगणीला दररोज ने-आण करतात. नेहमीप्रमाणे मंगळवार, दि. ३० रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पांचगणी येथून आठ विद्यार्थ्यांना घेऊन वडाप जीप महाबळेश्वरकडे येत होती. जीप अवकाळी हद्दीत आली असता महाबळेश्वरकडून वाईकडे जाणारी एसटी समोरून आली. एसटीला जागा देऊन पुढे जात असताना ही जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली. 
यात जीपचालक गणपत वागळे यांचेसह साक्षी प्रशांत मोरे (वय १५), सेजल निलेश धनावडे (१४), वेदांत दिलीप सुर्वे (१५), सुमित रवींद्र मोरे (१६), यश हनुमंत धनावडे (१२), साक्षी हनुमंत धनावडे (१४), साक्षी विजय जाधव (१६), यश रवींद्र मोरे (१५) हे जखमी झाले. 
सर्व जखमींना महाबळेश्वरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती समजताच पालकांनी ग्रामिण रूग्णालयात धाव घेतली. जखमीपैकी सुमित मोरे, सेजल धनावडे व साक्षी मोरे यांना पुढील उपचारासाठी वाई येथील खासगी रूग्णालयात पाठविले. याची पाचगणी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
 
एसटीच्या आगार व्यवस्थापकांना घेराव
समोरून आलेली बस अपघातास कारणीभूत असल्याची चर्चा शहरात सुरू झाल्याने संतप्त पालकांनी येथील बसस्थानकात गर्दी केली होती. युवासेनेचे व शिवसेनेचे पदाधिकारी विजय नायडू, शंकर ढेबे, सचिन वागदरे यांनी या संदर्भात आगारप्रमुख रमाकांत शिंदे यांना घेराव घालत प्रश्नांचा भडीमार केला. स्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर वाहतुक विभागाचे सहायक पोलिस निरिक्षक प्रज्ञा देशमुख हे कुमक घेऊन तत्काळ बसस्थानकात आल्या. 

Web Title: Eight injured in 'Vadap' collapsing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.