आठ किलो युरेनिअमसह दोघांना अटक
By admin | Published: December 22, 2016 04:49 AM2016-12-22T04:49:30+5:302016-12-22T04:52:20+5:30
५ हजार रुपयांहून अधिक रक्कम एकदाच बँकेत जमा करता येईल आणि तसे करताना प्रसंगी खातेदारांना स्पष्टीकरण
ठाणे : ठाण्यामध्ये आठ किलो ६१ ग्रॅम युरेनियमसह दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. या युरेनियमच्या साठ्याची किंमत साधारणपणे २४ कोटी रुपये असून त्याची विक्री करण्याचा या दोघांचा प्रयत्न होता, अशी माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सैफुल्ला वजाहदउल्ला खान आणि किशोर विश्वनाथ प्रजापती अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
घोडबंदर रोडवरील एका नामांकित हॉटेलजवळ दोघे जण युरेनियमसदृश पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी घोडबंदर परिसरात सापळा लावला आणि या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी युरेनियम हस्तगत केले. मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत यातील दोन नमुन्यांच्या केलेल्या तपासणीत एका अहवालामध्ये युरेनियमचे ८७.७० टक्के, तर दुसºया अहवालात ७९.५०५ टक्के असे प्रमाण आढळले. हे युरेनियम पाच ते दहा कोटी प्रतिकिलो दराने विकले जाते.
या दोघांनी मात्र ते ती कोटी प्रतिकिलो या दराने विक्रीसाठी आणले होते. अणुऊर्जा मंत्रालयाचे युरेनियमच्या साठ्यांवर पूर्णपणे नियंत्रण असताना, या दोघांनी ते कसे मिळविले?, त्यांनी ते कोणाकडून आणले? ते नेमके कोणाला विकणार होते? यामागे एखादी आंतरराष्टÑीय टोळी सक्रिय आहे का? याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) अधिका-यांकडूनही याबाबत माहिती घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘हे युरेनियम धोकादायक नाही’ हे युरेनियम हे ‘डिप्लेटेड’ प्रकारातील आहे. त्याचा अणुऊर्जानिर्मितीसाठी थेट उपयोग करता येऊ शकत नाही. त्यामुळे त्यापासून फारसे नुकसानही होत नाही. त्याची घनता जास्त असल्यामुळे मशीन बॅलन्सिंगसारख्या कामात उपयोग होतो, अशी माहिती ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
संहारक युरेनियम-
गुन्हेगारी जगतामध्ये रिव्हॉल्व्हरच्या काडतुसांपासून ते अगदी बॉम्ब बनवण्यापर्यंत युरेनियमचा उपयोग केला जातो. त्यामुळे ते प्रचंड किमतीमध्ये छुप्या मार्गाने विकले जाते, असे पोलिसांनी सांगितले.