Eknath Shinde: रात्रीचे आठ… अन् मंत्रालयात जनताजनार्दनाला भेटणारे मुख्यमंत्री; शिंदे सरकारला शंभर दिवस पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 06:06 AM2022-10-09T06:06:29+5:302022-10-09T06:06:43+5:30

नियोजित कार्यक्रम असला तरी सामान्यांना न भेटताच कस जायचे म्हणून त्यांनी सगळ्यांना भेटायचे ठरवले.

Eight o'clock in the night... and the Chief Minister Eknath Shinde meeting People in the Ministry; 100 days of Shinde government | Eknath Shinde: रात्रीचे आठ… अन् मंत्रालयात जनताजनार्दनाला भेटणारे मुख्यमंत्री; शिंदे सरकारला शंभर दिवस पूर्ण

Eknath Shinde: रात्रीचे आठ… अन् मंत्रालयात जनताजनार्दनाला भेटणारे मुख्यमंत्री; शिंदे सरकारला शंभर दिवस पूर्ण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या सामान्य नागरिकाला आस असते ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची. मुख्यमंत्रीदेखील भेट घेतल्याशिवाय मंत्रालय सोडत नाहीत. शुक्रवारी  रात्री साडेआठपर्यंत मुख्यमंत्री सामान्यांना भेटत होते.

योगायोगाने शुक्रवारी सरकारला शंभर दिवस झाले. सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ दिसून आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. हल्ली मंत्रालयात अभ्यागतांची वाढती संख्या ही मंत्रिमंडळ बैठकीच्यादिवशी जास्त असते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना भेटण्यासाठी नागरिक मोठ्या आशेने येत आहेत. 

शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी नियोजित परिवहन विभाग, मीराभाईंदर महापालिका विकास कामांचा आढावा, कोळी बांधवांच्या  समस्यांबाबत बैठका घेतल्या. त्यानंतर विले पार्ले येथे नियोजित कार्यक्रम होता. त्यासाठी मंत्रालयाबाहेर पडण्यापूर्वी त्यांनी अभ्यागतांच्या भेटी घेतल्या. तोपर्यंत सायंकाळचे पावणेआठ वाजले होते. आपल्याला भेटायला समिती कक्षाबाहेर किमान दीडशे ते दोनशे नागरिक उपस्थित असल्याचे त्यांना कळले. नियोजित कार्यक्रम असला तरी सामान्यांना न भेटताच कस जायचे म्हणून त्यांनी सगळ्यांना भेटायचे ठरवले. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील समिती कक्षात मुख्यमंत्री आले. त्यांनी प्रत्येकाची भेट घेतली. 

चेहऱ्यावर आनंद
निवेदने स्वीकारली त्यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी सूचनाही लिहिल्या. मुख्यमंत्री एवढ्या उशिराही मुख्यमंत्री भेटताहेत हे पाहून त्यांना भेटून बाहेर पडणाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते.

Web Title: Eight o'clock in the night... and the Chief Minister Eknath Shinde meeting People in the Ministry; 100 days of Shinde government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.