आठ अधिकाऱ्यांची मालमत्ता गोठविण्याचे आदेश
By admin | Published: January 10, 2015 01:11 AM2015-01-10T01:11:23+5:302015-01-10T01:11:23+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या शिफारशीवर राज्य शासनाच्या सेवेतील आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांची संपत्ती गोठविण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या शिफारशीवर राज्य शासनाच्या सेवेतील आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांची संपत्ती गोठविण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
यामध्ये माजी उपजिल्हाधिकारी नितीन ठाकूर (१४३ कोटी), सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिंडोरी, जि.नाशिक येथील उपअभियंता दादाजी खैरनार (२३ लाख), पुणे ग्रामीणचे पोलीस निरिक्षक भाऊसाहेब आंधळकर (९७ लाख), पुण्याच्या ससून रुग्णालयाचे वरिष्ठ सहाय्यक अशोक माने (२१ लाख), लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विजयकुमार बिराजदार (३८ लाख), गडचिरोलीचे मुख्याध्यापक पंढरी कावळे (७१ लाख), चंद्रपूरचे वरिष्ठ लिपिक विनोद निखाते (१२ लाख) तर गडचिरोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे कंपाऊंडर नितीश पोद्दार यांची साडेपाच लाख रुपयांची संपत्ती गोठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.