मारहाणप्रकरणी आठ जणांना अटक
By admin | Published: July 21, 2014 11:11 PM2014-07-21T23:11:17+5:302014-07-21T23:11:17+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका रूपाली पाटील यांच्यासह 8 जणांना अटक करून न्यायालयामध्ये सोमवारी हजर करण्यात आले. तसेच, त्यांच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल करण्यात आले.
Next
पुणो : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैसे वाटत असल्याच्या आरोपावरून भारती विद्यापीठाच्या उपप्राचार्यास मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका रूपाली पाटील यांच्यासह 8 जणांना अटक करून न्यायालयामध्ये सोमवारी हजर करण्यात आले. तसेच, त्यांच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल करण्यात आले.
समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी प्राध्यापक अभिनंदन मुके यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार भादंवि कलम 365, 323, 5क्4, 5क्6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. ही घटना 15 एप्रिल 2क्14 रोजी घडली.
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवाराकडून पैसे वाटले जात असल्याच्या संशयावरून मनसेच्या कार्यकत्र्यानी भारती विद्यापीठाचे उपप्राचार्य सुरेंद्र वेदपाठक यांना मारहाण करून समर्थ पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना घडलेल्या या प्रकाराने शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे
यांनी या प्रकरणी कारवाई व्हावी,
या मागणीकरिता समर्थ
पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
केले होते. मतदानाच्या दिवशीही
ते समर्थ पोलीस ठाण्यातच बसून राहिले होते. समर्थ पोलिसांनी आज आरोपपत्रदेखील दाखल केले. अॅड. एन. डी. पाटील, अॅड. विजय ठोंबरे
यांनी आरोपींना जामीन
देण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.(प्रतिनिधी)