राज्यातील आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावणार

By Admin | Published: November 6, 2016 06:33 PM2016-11-06T18:33:32+5:302016-11-06T18:33:32+5:30

राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या धावपटू कविता राऊतसह इतर आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.

Eight players from the state will join the government services | राज्यातील आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावणार

राज्यातील आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावणार

googlenewsNext
>मुंबई, दि.6 :  राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या धावपटू कविता राऊतसह इतर आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. तशा प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. 
 राज्यातील क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे विशेष धोरण आहे. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव  स्वाधीन क्षत्रिय  यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अशा गुणवंत खेळाडूंबाबत चर्चा  केली. त्यानंतर  या समितीने आठ खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक व क्रीडाविषयक पात्रतेनुसार शासकीय सेवेत थेट सामावून घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यास मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि क्रीडा मंत्री  विनोद तावडे यांनी मान्यता दिली आहे. 
      या खेळाडूंमध्ये संदीप यादव (क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा विभाग), कविता राऊत(आदिवासी विकास विभाग), ओंकार ओतारी (तहसीलदार, महसूल विभाग), अजिंक्य दुधारे(क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा विभाग), श्रीमती पूजा घाटकर (विक्रीकर निरीक्षक, विक्रीकर विभाग), नितीन मदने(तहसीलदार, महसूल विभाग), श्रीमती किशोरी शिंदे ( नगरविकास विभाग) आणि श्रीमती नितू इंगोले( क्रीडा विभाग) यांचा समावेश आहे.

Web Title: Eight players from the state will join the government services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.