मडगावसाठी आठ फेऱ्या
By Admin | Published: May 18, 2015 04:18 AM2015-05-18T04:18:02+5:302015-05-18T04:18:02+5:30
कोकण रेल्वे प्रवाशांना मध्य रेल्वेकडून चांगलाच दिलासा देण्यात आला आहे. सध्या गर्दीचा हंगाम असल्याने मडगावपर्यंत आणखी आठ विशेष
मुंबई : कोकण रेल्वे प्रवाशांना मध्य रेल्वेकडून चांगलाच दिलासा देण्यात आला आहे. सध्या गर्दीचा हंगाम असल्याने मडगावपर्यंत आणखी आठ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. 0१00५ ट्रेन एलटीटीहून २३ मे आणि ३0 मे रोजी 00.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मडगाव येथे ११.३0 वाजता पोहोचेल. 0१00६ ट्रेन त्याच दोन दिवशी मडगावहून १२.३0 वाजता सुटेल आणि एलटीटी येथे २३.४५ वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 0१0४५ एलटीटीहून २४ आणि ३१ मे रोजी 0१.१0 वाजता सुटून मडगाव येथे १२.३0 वाजता पोहोचेल. 0१0४६ ट्रेन याच दोन दिवशी मडगाव येथून १६.00 वाजता सुटून एलटीटी येथे ३.३0 वाजता पोहोचेल. त्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. १७ मे पासून तिकीट विक्री होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.