नांदेडमध्ये आठ विद्यार्थ्यांना विषबाधा
By admin | Published: August 3, 2016 05:25 AM2016-08-03T05:25:22+5:302016-08-03T05:25:22+5:30
मसलगातांडा येथील आठ विद्यार्थ्यांना सोमवारी सायंकाळी विषबाधा झाली़ त्यांनी शाळेत खिचडी खाल्ली होती.
भोकर (जि. नांदेड) : मसलगातांडा येथील आठ विद्यार्थ्यांना सोमवारी सायंकाळी विषबाधा झाली़ त्यांनी शाळेत खिचडी खाल्ली होती.
मनोज अकाराम राठोड (११), विशाल विठ्ठल राठोड (१३), संजय पवार (१२), बेबीताई बालाजी राठोड (१२), देवकाबाई आप्पाराव राठोड (१३), रुपाली भाऊराव राठोड (१३), करण भाऊराव आडे (१२), चांगुणा संजय राठोड (११) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. भोकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर सर्वांना घरी पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ़ मार्तंड आयनेले यांनी दिली. शाळेतील सर्वच मुलांनी खिचडी खाल्ली होती़ मात्र आठ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली़ त्यामुळे विषबाधेचे कारण स्पष्ट झालेले नाही. (प्रतिनिधी)