सीमावादातून आठ गावे अंधारात!

By Admin | Published: February 4, 2015 02:05 AM2015-02-04T02:05:25+5:302015-02-04T02:05:25+5:30

दफ्तरदिरगांईमुळे महाराष्ट्राकडून वीजपुरवठा झाला नाही.तर तेलगंणने सहानुभूती मिळावी म्हणून सीमा भागातील १४ गावांना वीजपुरवठा केला़

Eight villages from the border are in the dark! | सीमावादातून आठ गावे अंधारात!

सीमावादातून आठ गावे अंधारात!

googlenewsNext

संघरक्षित तावाडे
ल्ल जिवती (जि़ चंद्रपूर)
दफ्तरदिरगांईमुळे महाराष्ट्राकडून वीजपुरवठा झाला नाही.तर तेलगंणने सहानुभूती मिळावी म्हणून सीमा भागातील १४ गावांना वीजपुरवठा केला़ मात्र, बील भरले नसल्याचे सांगत दोन महिन्यांपूर्वी ८ गावांचा पुरवठा तोडण्यात आल्याने ही गावे अंधारात बुडाली आहेत़ दुसरीकडे वीजबीलच मिळाले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एकूणच महाराष्ट्र व तेलंगण राज्याच्या सीमावादात ही गावे भरडली जात आहेत़
जिवती तालुक्याच्या सिमेवरील १४ गावे वादग्रस्त असून, या गावांत दोन्ही राज्यांच्या काही प्रमाणात सुविधा आहेत. पैकी लेंडीगुडा, भोलापठार, अंतापूर, येसापूर, इंदिरानगर, पद्मावती, कामतगुडा या गावांना तेलंगणने वीज पुरवठा केला़ मात्र, दोन महिन्यांपूर्वी तो खंडित केला आहे़ परिणामी या गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे़ विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते़
या आठही गावांजवळ राजीव गांधी ग्रामीण योजनेतंर्गत महाराष्ट्र शासनाने खांब उभे करून केवळ ट्रान्सफार्मर बसविले आहेत.
जोपर्यंत येथील रहिवाशी डिमांड भरत नाहीत, तोपर्यंत वीजजोडणी देता येणार नसल्याचे जिवतीचे उपकार्यकारी अभियंता एन.एम. वैरागडे यांनी स्पष्ट केले. तर
या ठिकाणी आताच आलो
असून, यासंदर्भात आपल्याला काहीच माहित नसल्याचे बल्लारपूरचे कार्यकारी अभियंता चोपडे यांनी सांगितले.
महाराष्ट्राची वीज नसली तरी पूर्वी तेलंगण राज्यातून वीजपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना अडचण नव्हती. मात्र तेलंगणनेही वीज कापल्याने पिठगिरणी, शेतातील वीजपंप बंद पडले आहेत. अतिसंवेदनशिल व दुर्गम असलेली ही गावे अंधारात बुडाली आहेत़

राजीव गांधी ग्रामीण विकास योजनेतंर्गत या गावांसाठी डीपीपर्यंत खांब उभे केले आहेत. पूर्वी या गावात तेलंगणची वीज उपलब्ध असल्याने गावात खांब व तार टाकले नाहीत. येथील लोकांकडून डिमांड मागितले; पण डिमांड अर्ज प्राप्त न झाल्याने खांब उभे केले नाहीत.
- के.एन. पिदूरकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, बल्लारपूर विभाग

सीमावर्ती भागातील ग्राहक वीजबिल भरत नसल्याने वीजजोडणी कापण्यात आली. वीजबील भरणा केल्यानंतर पुरवठा पूर्ववत केला जाईल.
- पी. रवींद्र, लाईनमन,
चेरामेरी (तेलंगण)

सीमावर्ती भागातील आठ गावांचे वीज कनेक्शन कापल्याची आपल्याला माहिती नाही. असा प्रकार असल्यास खरोखर ते गंभीर आहे. याबाबत चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई करू.
- पी. श्रीनिवासन जय, सहायक अभियंता, बेलमपूर विभाग (तेलंगण)

Web Title: Eight villages from the border are in the dark!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.