रुळांवर संपले अठराशे जीव

By admin | Published: April 5, 2016 06:04 PM2016-04-05T18:04:45+5:302016-04-05T18:16:12+5:30

रूळ ओलांडणा-यांविरोधात पश्चिम रेल्वेनं उघडलेल्या मोहिमेंतर्गत पश्चिम रेल्वे आरपीएफने तब्बल 16 हजार 674 केसेसची नोंद

Eighteen Creatures Ended With Roles | रुळांवर संपले अठराशे जीव

रुळांवर संपले अठराशे जीव

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५- रूळ ओलांडताना अपघात होऊ नये यासाठी रूळ ओलांडणा-यांविरोधात पश्चिम रेल्वेनं उघडलेल्या मोहिमेंतर्गत पश्चिम रेल्वे आरपीएफने तब्बल 16 हजार 674 केसेसची नोंद केली आहे. मात्र तरीही अपघातांची संख्या फारशी कमी झाल्याचे दिसून येत नाही. रुळ ओलांडणा-या जवळपास 16,674 प्रवाशांना पकडले असून, जवळपास 16,120 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यात 79 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 
कुठे घडतात प्रकार ?
दादर, माहीम, वांद्रे, खार, सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, नालासोपारा, वसई, विरार या स्टेशन्सजवळ मोठ्या प्रमाणात रुळ ओलांडण्याचे प्रकार घडतात.
उपाय काय योजले ?
रुळ ओलांडून अपघात होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वे आणि एमआरव्हीसीने नवीन पादचारी पूल बांधण्याचे नियोजन केले आहे. रेल्वे अर्थसंकल्पातही पादचारी पुलांसाठी आर्थिक निधी पश्चिम रेल्वेला मिळाला आहे. 
 

Web Title: Eighteen Creatures Ended With Roles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.