एकादस सरली, गर्दी ओसरली मात्र उत्साह कायम

By admin | Published: July 16, 2016 08:04 AM2016-07-16T08:04:59+5:302016-07-16T08:10:22+5:30

एकादशीनिमित्त १५ लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले. पहाटे चारपासून रात्री बारा पर्यंत ६० हजारापेक्षा अधिक भाविकानी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.

Ekadas straightforward, the crowds disappeared but the enthusiasm continued | एकादस सरली, गर्दी ओसरली मात्र उत्साह कायम

एकादस सरली, गर्दी ओसरली मात्र उत्साह कायम

Next
>ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. १६ -  एकादशीच्या निमित्त १५ लाखाहून अधिक भाविक आज पंढरीत दाखल झाले होते. पहाटे चारच्या सुमारास पददर्शनासाठी मंदिर खुले झाल्यापासून रात्री बारा पर्यंत ६० हजारापेक्षा अधिक भाविकानी विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्शदर्शन घेतले. 
सकाळ पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मंदिराच्या महाद्वार रस्त्यवर पाय ठेवायलाही जागा नव्हती इतकी प्रचंड गर्दी सतत होती पाच नंतर मात्र गर्दी हळू हळू ओसरायला लागली असली तरी आताही (रात्री १२वा.) नामदेव पायरीसमोर महाव्दारावर दोन - तीन हजार भाविक सातत्याने आहेत... 
महाव्दाराच्या समोरील बाजूस एलईडी स्क्रिनवर विठ्ठल रुक्मिणीचे थेट प्रक्षेपण असल्याने देव दिसल्यावर भाविकांच्या आनंदाला पारावार उरत नाही. रात्री बारा वाजता सुध्दा अनेक दिंड्या भजन- कीर्तन करत महाद्वार पर्यंत येताहेत व नामदेव पायरी दर्शन घेवून पुन्हा मठाकडे परतत आहेत... त्यमुळे एकदशी सरली गर्दी ओसरली तरी भाविकांचा उत्साह तूस भरही कमी झाला नाही अस चित्र विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर दिसत आहे.  त्यापैकी सुमारे 60 हजारा पेक्षा अधिक  भाविकानी आज विठ्ठलाचे पददर्शन घेतले..

Web Title: Ekadas straightforward, the crowds disappeared but the enthusiasm continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.