गुरुकुल क्लासेसचा ओंकार देशपांडे देशात आठवा

By admin | Published: June 12, 2017 02:25 AM2017-06-12T02:25:31+5:302017-06-12T02:25:31+5:30

जेईई अ‍ॅडव्हान्सच्या रविवारी (दि.११) घोषित झालेल्या निकालात निर्मल बिस्वाल यांच्या गुरुकुल क्लासेसचा विद्यार्थी ओंकार देशपांडे याने देशात आठवा क्रमांक पटकावला.

Ekkar patriot of gurukul classes | गुरुकुल क्लासेसचा ओंकार देशपांडे देशात आठवा

गुरुकुल क्लासेसचा ओंकार देशपांडे देशात आठवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जेईई अ‍ॅडव्हान्सच्या रविवारी (दि.११) घोषित झालेल्या निकालात निर्मल बिस्वाल यांच्या गुरुकुल क्लासेसचा विद्यार्थी ओंकार देशपांडे याने देशात आठवा क्रमांक पटकावला.
देशपातळीवरील अभियांत्रिकीच्या आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत निर्मल बिस्वाल यांच्या गुरुकुल क्लासेसने घवघवीत यश मिळविले. क्लासेसचे तब्बल ७० टक्के विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले. आयआयटी फाउंडेशन कोर्सपासून क्लासचा विद्यार्थी असलेल्या ओंकार देशपांडे याने अभ्यासात सातत्य कायम ठेवून देशपातळीवर आठवा क्रमांक पटकावला. यासोबतच तब्बल २८ विद्यार्थ्यांनी निकालात देशपातळीवर उत्तम क्रमांक पटकावण्यात यश मिळविले. निकालाची घोषणा होताच जालना रोडवरील क्लासच्या मुख्य इमारतीसमोर जल्लोष करण्यात आला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात मिठाई वाटून स्वागत करण्यात आले. या वेळी क्लासेसचे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षकांनी आनंदोत्सवात सहभाग नोंदवला. निर्मल यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार केला. क्लासेसचे बहुसंख्य विद्यार्थी आयआयटीमध्ये प्रवेशास पात्र ठरतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

ओंकार देशपांडे हा २० एप्रिल २०१३ला फाउंडेशन कोर्ससाठी गुरुकुल क्लासेसला जॉइन झाला. त्याच्या अभ्यासातील उत्तम कामगिरीमुळे बिस्वाल यांनी त्याला ११वी व १२वीसाठीची ‘सुपर-३०’ या स्कॉलर बॅचला प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित केले.
गुरुकुलमध्ये त्याचा रोल नंबर जीसी १७११० तर जेईई अ‍ॅडव्हान्सचा रोल नंबर १०२१२२४ असा होता. अकरावीमध्ये असताना त्याने केव्हीपीवायमध्ये देशात २४वा क्रमांक पटकावला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आॅलिम्पियाड परीक्षांमध्ये पात्र ठरण्यासोबतच ओंकारने अ‍ॅस्ट्रोनॉमी आॅलिम्पियाडमध्ये देशात १०वा क्रमांक मिळविला आहे.
‘बीटसॅट’मध्ये त्याचा स्कोर ४५०पैकी ४३८ असा आहे. यासोबतच एमएचसीईटीमध्ये त्याला २००पैकी १९२ गुण मिळाले असून, आयआयटी-जेईई परीक्षेत इतिहास घडवत देशातून ८व्या क्रमांकावर आहे.

Web Title: Ekkar patriot of gurukul classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.