‘‘देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादांनी मिळून तिकीट कापलं असं वाटत नाही’’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 03:09 PM2020-05-16T15:09:27+5:302020-05-16T15:19:57+5:30

मी स्वतःहूनच, विधानपरिषद नको, असं संसदीय मंडळाच्या बैठकीत जाहीर केलं होतं. त्यामुळे माझं तिकीट कापल्याचा विषयच नाहीः विनोद तावडे

Eknath Khadse candidature: Vinod Tawde defends Devendra Fadnavis and Chandrakant Patil ajg | ‘‘देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादांनी मिळून तिकीट कापलं असं वाटत नाही’’

‘‘देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादांनी मिळून तिकीट कापलं असं वाटत नाही’’

Next
ठळक मुद्देभाजपामध्ये विधानपरिषद उमेदवारीवरून पक्षनेतृत्वाच्या विरोधातील सूर ऐकू येत आहेत.एकनाथ खडसेंना विधानपरिषदेची अपेक्षा होती. त्यांनी ती जाहीरपणे बोलूनही दाखवली होती.टीकेचा रोख प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं जाणवतं.

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी झालेली निवडणूक बिनविरोध झाली असली, तरी भाजपामध्ये उमेदवारीवरून पक्षनेतृत्वाच्या विरोधातील सूर ऐकू येत आहेत. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या चार निष्ठावंत आणि अनुभवी नेत्यांना विधानपरिषदेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यावरून, अंतर्गत कुरबुरी, धुसफूस सुरू आहेच; पण खडसेंसह काही अन्य नेते आपला राग जाहीरपणेही व्यक्त करत आहेत. त्यांचा रोख प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं जाणवतं. मात्र, भाजपाचे नेते, माजी मंत्री विनोद तावडे यांना तसं अजिबात वाटत नाही.

पंकजा मुंडेंचे पंख छाटण्याचे प्रयत्न, एकनाथ खडसे यांचा आरोप

विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

भाजपानं विधान परिषद नाकारली; पंकजा मुंडे मध्यरात्री ट्विट करून म्हणाल्या...

‘‘नाथाभाऊंविषयी असणारं प्रेम, आदर आणि पंकजा मुंडेंनी केलेल्या कामाचं कौतुक आजच्या नेतृत्वालाही आहे. तिकीट नाकारलं म्हणजे पक्षाने सर्वस्वी पक्षाने दूर केलं, असा अर्थ नाही. विधानसभा आणि विधानरपरिषदेच्या वेळी खडसेंना तिकीट मिळावं यासाठी देवेंद्र फडणवीस आणि  चंद्रकांत पाटील यांनी  प्रयत्न  केले होते. त्यामुळे या दोघांनी मिळून खडसे-मुंडेंचं तिकीट कापलं असं मला वाटत नाही. तो केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय आहे’’, असं मत विनोद तावडे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत मांडलं. मी स्वतःहूनच, विधानपरिषद नको, असं संसदीय मंडळाच्या बैठकीत जाहीर केलं होतं. त्यामुळे माझं तिकीट कापल्याचा विषयच नाही. पण, विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यानं सुरुवातीला नाराज झालो होतो, त्यामागचं कारणही कोरोनानंतर नेतृत्वाकडून समजून घेणार आहे. आपले आणि देवेंद्र फडणवीसांचे संबंध चांगलेच होते आणि आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ खडसेंबाबत असे घडणे दुर्दैवी - गडकरी

विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ऑफर आली होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

भाजपाच्या विधानपरिषदेसाठी झालेल्या तिकीटवाटपावर देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा दिसतो. गोपीचंद पडळकर, रणजीतसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि रमेश कराड हे चौघेही त्यांच्या जवळचे मानले जातात. स्वाभाविकच, आपल्या विश्वासू शिलेदारांसाठी देवेंद्र फडणवीसांनी स्पर्धकांना दूर ठेवलं,  अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे, एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातही उघडपणे शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यामुळे खडसे वेगळा निर्णय घेणार का, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं आमंत्रण स्वीकारणार का, अशी कुजबूज सुरू झालीय. मात्र, बाळासाहेब थोरातांना नाथाभाऊंच्या स्वागताची संधी अजिबात मिळणार नाही, गेली अनेक दशकं मेहनत करून वाढवलेला पक्ष ते सोडणार नाहीत, असंही विनोद तावडे यांनी ठामपणे सांगितलं. 

खडसेंवर अन्याय झाला का?; चंद्रकांत पाटलांनी सांगितली गाय-बकरीची गोष्ट

खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली; दोघांनी मोठीच्या मोठी यादीच वाचली

एकनाथ खडसेंना विधानपरिषदेची अपेक्षा होती. त्यांनी ती जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यानं ते नाराज झाले  असतील, चिडले असतील. मात्र, पक्ष नेतृत्वाने चर्चा केल्यानंतर ती नाराजी संपेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंकजा मुंडेंशी एक दिवसाआड बोलणं होतं. त्यांना जे म्हणायचं होतं, ते त्या बोलल्या आहेत, असंही तावडेंनी सांगितलं. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'आमदार' झाले; ९ जणांचे विधान परिषद सदस्यत्व जाहीर

एकनाथ खडसे 'वेगळा निर्णय' घेतील?... भाजपा सोडल्यास कोणत्या पक्षात जातील?

भाजपाची सत्ता असती तर १२-१३ जणांना विधानपरिषदेवर पाठवता आलं असतं. आत्ता संधी दिली नसली, तरी भविष्यात संधी दिली जाईल आणि त्यांच्या क्षमतेचा उपयोग पक्षाला होत राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसंच, मी गायब नाही. ज्या विषयांवर बोलणं आवश्यक आहे त्याबाबत मी बोलतो आणि बोलत राहीन आणि पक्ष माझ्यावर जी जबाबदारी सोपवेल ती मी पार पाडेन, असंही ते म्हणाले.

Read in English

Web Title: Eknath Khadse candidature: Vinod Tawde defends Devendra Fadnavis and Chandrakant Patil ajg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.