Eknath Khadse : अखेर ठरलं! राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 04:08 PM2023-03-10T16:08:02+5:302023-03-10T16:08:53+5:30

Eknath Khadse : राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Eknath Khadse : Finally decided! From NCP, Eknath Khadse has a big responsibility of NCP | Eknath Khadse : अखेर ठरलं! राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

Eknath Khadse : अखेर ठरलं! राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

googlenewsNext

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एकनाथ खडसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी वर्णी लागल्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी नियुक्तीचे पत्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र देण्यात आले होते. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. याशिवाय, विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
    
दरम्यान, एकनाथ खडसे यांचा राजकीय कारकिर्दीचा दांडगा अनुभव लक्षात घेता राष्ट्रवादी पक्षाने त्यांना ही मोठी सोपविली आहे. यासोबतच खडसे यांना अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांची नियुक्ती करत राष्ट्रवादीने एकप्रकारे भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसेंच्या माध्यमातून जळगावमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला त्याचा मोठा फायदा होणार आहे.

भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय संघर्ष अनेकवेळा जळगावमध्ये पाहायला मिळतो. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादीने पुन्हा मोठी जबाबदारी दिली आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. एकनाथ खडसे यांच्या नियुक्ती करत राष्ट्रवादीने एकप्रकारे भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Eknath Khadse : Finally decided! From NCP, Eknath Khadse has a big responsibility of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.