Eknath Khadse : वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते मुलांनी एका मिनिटात गमावलं - एकनाथ खडसे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 01:13 PM2022-10-09T13:13:05+5:302022-10-09T13:18:25+5:30

Eknath Khadse And ShivSena Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. 

Eknath Khadse reaction over ShivSena Uddhav Thackeray Over election sign bow and arrow | Eknath Khadse : वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते मुलांनी एका मिनिटात गमावलं - एकनाथ खडसे

Eknath Khadse : वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते मुलांनी एका मिनिटात गमावलं - एकनाथ खडसे

googlenewsNext

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला, तसेच या दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या  निर्णयामुळे शिवसेनेतील उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता ठाकरे, शिंदे गटाने केली होती. शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे? या प्रकरणाबाबतची निवडणूक आयोगासमोरील पुढील सुनावणी आता येत्या सोमवारी होणार आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"बाळासाहेबांची वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली, हे अत्यंत क्लेशदायक... वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते मुलांनी एका मिनिटात गमावलं" असं खडसेंनी म्हटलं आहे. तसेच "आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली, ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली, ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज केली, महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री झाले ही, वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली. मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा."

"हे अत्यंत दु:खद गोष्ट आणि क्लेशदायक"

"वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते एका मिनिटामध्ये मुलांनी गमावलं. याला कोण जबाबदार आहे, कोण नाही हे तर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर समजेल. परंतू, तात्पुरता का होईना निवडणूक चिन्ह गोठवण हे अत्यंत दु:खद गोष्ट आणि क्लेशदायक" असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. यानंतर आता भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "मुख्यमंत्रीपदापायी मती गेली, मतीविना हिंदुत्वनीती गेली, इतके अनर्थ पदाच्या लोभाने केले" असं म्हणत भाजपानेउद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. 

"मुख्यमंत्रीपदापायी मती गेली, मतीविना हिंदुत्वनीती गेली, इतके अनर्थ पदाच्या लोभाने केले"

भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मुख्यमंत्रीपदापायी मती गेली, मतीविना हिंदुत्वनीती गेली, नीतीविना जनता गेली. जनतेसोबत सैनिक गेले, सैनिकानंतर चिन्ह व पक्षही गेला, इतके अनर्थ मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने केले" असं उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मनसेने शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. "आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादीच "घड्याळ"नाहीतर अबू आझमीच्या "सायकल"चाच आधार" असं म्हणत हल्लाबोल केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Eknath Khadse reaction over ShivSena Uddhav Thackeray Over election sign bow and arrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.