Eknath Khadse : "पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?"; एकनाथ खडसेंचा शिंदे गटावर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 02:13 PM2022-09-15T14:13:49+5:302022-09-15T14:23:18+5:30
Eknath Khadse And CM Eknath Shinde : "आपल्या जिल्ह्यातील 5 आमदार शिंदेंच्या गटात गेले. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना वाढवली, घडवली."
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?" असं म्हणत शिंदे गटावर घणाघात केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं घाणेरडं राजकारण कधी झालं नव्हतं. खोक्यांची भाषा कधी झाली नव्हती असंही म्हटलं आहे. यासोबतच धनुष्यबाणाच्या जोरावर, बाळासाहेबांच्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात आणि त्यांच्याशी धोका देऊन दुसरीकडे गेलात हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे असं म्हणत निशाणा साधला आहे.
"राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. राज्यात झालेले फेरबदल जनतेला फार काही आवडलेले नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं घाणेरडं राजकारण कधी झालं नव्हतं. खोक्यांची भाषा कधी झाली नव्हती. निवडणुका विचाराने लढल्या जायच्या. अलीकडे हे सरकार पाडायच, ते पाडायचं हेच चाललं आहे" असं टीकास्त्र एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सोडलं आहे.
"बाळासाहेबांच्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात आणि त्यांच्याशी धोका देऊन दुसरीकडे गेलात"
"आपल्या जिल्ह्यातील 5 आमदार शिंदेंच्या गटात गेले. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना वाढवली, घडवली. धनुष्यबाणाच्या जोरावर, बाळासाहेबांच्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात आणि त्यांच्याशी धोका देऊन दुसरीकडे गेलात हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. राज्यातील जनता तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही" असंही खडसेंनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"आपल्याला हा मतदारसंघ जिंकायचा आहे"
"तुम्ही 200 कोटीच काय 600 कोटी आणले असतील पण तत्त्व आणि सत्त्व शिल्लक राहिले नाही. पण निष्ठा शिल्लक नसेल तर 200 कोटी आणले काय आणि 600 कोटी आणले, त्याला काय अर्थ आहे? पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?" असं म्हणत टीका केली आहे. तसेच आपल्याला हा मतदारसंघ जिंकायचा आहे हा दृष्टीने काम करायचं आहे. हा मतदारसंघ पिंजून काढायचा आहे असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.