झोटींग समितीचा एकनाथ खडसेंचा झटका

By admin | Published: March 3, 2017 08:38 PM2017-03-03T20:38:56+5:302017-03-03T21:04:42+5:30

झोटींग समितीने माजी मंत्री एकनाथ खडसेंचा दोन पैकी एक अर्ज फेटाळून लावित चांगलाच झटका दिला. तर दुसºया अर्जावर येत्या ६ तारखेला निर्णय होणार आहे.

Eknath Khadseen jhote of Zoting Committee | झोटींग समितीचा एकनाथ खडसेंचा झटका

झोटींग समितीचा एकनाथ खडसेंचा झटका

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 03 - झोटींग समितीने माजी मंत्री एकनाथ खडसेंचा दोन पैकी एक अर्ज फेटाळून लावित चांगलाच झटका दिला. तर दुसºया अर्जावर येत्या ६ तारखेला निर्णय होणार आहे.
महसूल मंत्री असताना पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीची जागा आपल्या नातेवाईकांना पदाचा गैरवापर करून दिल्याचा आरोप त्यांचावर आहे. या आरोपाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती डी. झोटींग यांची समिती गठित करण्यात आली. समितीने आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून संबंधित अधिकायांची साक्षही नोंदविली. माजी मंत्री एकनाथ खडसेंनी आपली साक्ष समितीसक्षम दिली. पूर्वी व्यवहारचे समर्थन करणाºया खडसेंनी व्यवहाराबाबत माहिती नसल्याची साक्ष समितीसमोर नोंदवित एक प्रकारे आपल्या भूमिकेपासून घुमजाव केला.
खडसे यांनी समितीच्या कार्यकक्षेवर आक्षेप नोंदवित काही मुद्दे वगळून काही मुद्यांचा नव्याने समावेश करणा-या मागणीचा अर्ज सादर केला होता. त्याच प्रमाणे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव आणि एमआयडीसीचे तत्कालीन सीईओ यांनाही चौकशीसाठी नव्याने बोलाविण्याचाही अर्ज दिला होता. या अर्जावर दोन्ही पक्षांची सुनावणी समितीसमोर झाली. एमआयडीसीचे वकिल चंद्रशेखर जलतारे यांनी यावर आक्षेप घेतला होता. दरम्यान शुक्रवारी समितीचे अध्यक्ष झोटींग यांनी राव आणि गगरानी यांना चौकशीसाठी नव्याने
बोलाविण्याचा अर्ज फेटाळून लावला. हा खडसे यांना मोठा झटका मानल्या जात आहे. तर दुस-या अर्जावर सोमवार ६ तारखेला निर्णय घेणार असल्याची माहिती एमआयडीसीचे वकिल जलतारे यांनी दिली.

Web Title: Eknath Khadseen jhote of Zoting Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.