एकनाथ खडसेंना धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
By admin | Published: February 22, 2016 02:11 AM2016-02-22T02:11:08+5:302016-02-22T02:11:08+5:30
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात रविवारी सुनील पाटील (रा. मुक्ताईनगर) व आनंद पाटील
जळगाव : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात रविवारी सुनील पाटील (रा. मुक्ताईनगर) व आनंद पाटील (रा. जळगाव) यांच्या जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये ८ दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपाचे जिल्हा चिटणीस भरत तोताराम महाजन (रा. फैजपूर) यांनी फिर्याद दिली होती. सुनील पाटील हा मुक्ताईनगर येथील शिवसेनेचा कार्यकर्ता तर आनंद पाटील हा मू. जे. महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची अधिक माहिती अजून मिळालेली नाही. सुनील याचा तो फेसबुकवरील मित्र आहे, एवढीच माहिती सध्या पुढे आली आहे.
१२ व १३ फेब्रुवारीला दोघांनी फेसबुकवर खडसे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. (प्रतिनिधी)