पीए लाचखोरी प्रकरणी एकनाथ खडसेंना क्लीन चीट

By Admin | Published: July 16, 2016 03:58 PM2016-07-16T15:58:32+5:302016-07-16T16:03:33+5:30

कथित पीए गजानन पाटील लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माजी मंत्री एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली आहे

Eknath Khadseenna clean chit in case of BA bribe case | पीए लाचखोरी प्रकरणी एकनाथ खडसेंना क्लीन चीट

पीए लाचखोरी प्रकरणी एकनाथ खडसेंना क्लीन चीट

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 16 - कथित पीए गजानन पाटील लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माजी मंत्री एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली आहे. एसीबीने मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एसीबी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं असून आरोपपत्रात एकनाथ खडसेंचा उल्लेख नाही आहे. त्यामुळे या प्रकरणातून निर्दोष सुटण्याचा एकनाथ खडसेंचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
गजानन पाटीलला खडसेंच्या मंत्रालयातील दालनातून ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र एसीबीच्या आरोपपत्रात खडसेंचे मंत्रालयातील दालन असा उल्लेक न करता मंत्रालय असा उल्लेख करण्यात आला आहे.  १ हजार पेक्षा जास्त पानांचे हे आरोपपत्र आहे. फक्त गजानन पाटील यालाच फक्त आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे एसीबीने एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली असं स्पष्ट होतं.
 
लोकायुक्तांकडूनही एकनाथ खडसेंना अगोदरच क्लिन चिट मिळालेली आहे. तक्रारदार  रमेश जाधवांनी एकनाथ खडसेंविरोधात लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. लोकायुक्तांनी रमेश जाधव आणि गजानन पाटील यांच्यातील संभाषणाच्या 12 रेकॉर्डिंग तपासल्या. मात्र ती 30 कोटींची लाच एकनाथ खडसेंद्वारे मागितल्याचं कुठंच सिद्ध होत नसल्यामुळं लोकायुक्तांनी एकनाथ खडसेंना क्लीनचिट दिली होती.
 
एकनाथ खडसे यांचा खासगी पीए असल्याचं सांगणाऱ्या गजमल पाटील उर्फ गजानन पाटील, याला 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी 14 मे रोजी अटक करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात त्याला अटक केली होती.  ठाण्यातील मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थेला जमीन हस्तांतरित करण्यासठी गजानन पाटीलने संस्थेच्या विश्वस्तांकडे तब्बल 30 कोटींची लाच मागितली होती. यानंतर संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. त्यावर कारवाई करत एसीबीने गजानन पाटीलला मंत्रालयात अटक केली होती.
 

Web Title: Eknath Khadseenna clean chit in case of BA bribe case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.