मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ खडसेंची पाठराखण

By admin | Published: June 18, 2016 01:57 PM2016-06-18T13:57:17+5:302016-06-18T15:14:10+5:30

पुण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांची पाठराखण केली. एकनाथ खडसे यांच्यावरील आरोप तथ्यहीन आहेत.

Eknath Khadseen's support from Chief Minister | मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ खडसेंची पाठराखण

मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ खडसेंची पाठराखण

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १८ -  भाजपच्या दोन दिवसाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसाठी पुण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांची पाठराखण केली. एकनाथ खडसे यांच्यावरील आरोप तथ्यहीन असून लवकरच ते यातून बाहेर पडतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसे यांच्या मोबाईलवर दाऊदकडून कुठलाही कॉल आलेला नाही हे एटीएसच्या तपासात स्पष्ट झाले आहे. 
 
गजानन पाटील लाच प्रकरणाशीही खडसेंचा संबंध नसल्याचे एसीबीच्या तपासातून समोर आले आहे. एमआयडीसी जमीन गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे खडसेंनी राजीनामा दिला असून, लवकरच ते यातून बाहेर येतील असे फडणवीस यांनी सांगितले.पारदर्शक आणि जनताभिमुख कारभार असलेले सरकार कोठेही सापडत नसल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकार विरोधात गोबेल्स निती राबविली जात  असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.  
 
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात शनिवारी सुरु झाली़ यावेळी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़. यावेळी फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचा भष्ट्राचार खणून काढा, त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले़ 
 
सरकार अनेक आघाड्यांवर काम करीत आहे़, सरकार काय करते आहे, ते समजून घ्या़ शेतक-यांना विमा दिला, १ कोटी शेतक-यांना ४ हजार कोटींचा विमा वाटप केले, असे त्यांनी सांगितले़.
 
 

Web Title: Eknath Khadseen's support from Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.