खान्देशातील आमदारांना एकनाथ खडसेंनी रोखले

By admin | Published: October 23, 2014 02:44 AM2014-10-23T02:44:16+5:302014-10-23T02:44:16+5:30

मुख्यमंत्रिपदासाठी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंगचा प्रयत्न करणाऱ्या खान्देशातील आमदारांना एकनाथ खडसे यांनी बुधवारी रोखल्याची माहिती हाती आली आहे.

Eknath Khadseneni prevented the farming from the stakeholders | खान्देशातील आमदारांना एकनाथ खडसेंनी रोखले

खान्देशातील आमदारांना एकनाथ खडसेंनी रोखले

Next

जळगाव : मुख्यमंत्रिपदासाठी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंगचा प्रयत्न करणाऱ्या खान्देशातील आमदारांना एकनाथ खडसे यांनी बुधवारी रोखल्याची माहिती हाती आली आहे. भाजपा कार्यकारिणीचा निर्णय मान्य राहील, असेही त्यांनी सांगितले.
खान्देशातील काही आमदारांसह एकूण ३५ आमदारांनी मुंबईतच खडसे यांची भेट घेतली. त्यात बहुजन चेहऱ्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. पक्षाने सातत्याने बहुजन चेहरा दिल्यामुळे राज्यात भाजपाचा विस्तार झाला. गोपीनाथ मुंडेनंतर आता बहुजन चेहरा पुढे केला जावा, असे मुद्दे बैठकीत समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. खान्देशातील आमदारांनी खडसेंना मुख्यमंत्री करावे यासाठी पक्ष नेतृत्वाकडे मागणी करण्याचा प्रस्ताव आणला, पण त्याला खडसे यांनीच नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोकण, मुंबई, मराठवाडा व इतर विभागांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. खान्देशच वंचित राहिला आहे. आता खान्देशला संधी मिळावी, अशी अपेक्षा आमदारांनी खडसेंकडे व्यक्त केली. खान्देशातील आमदार खडसेंसोबत मुंबईत होते. जे आमदार मुंबईत भेटू शकले नव्हते ते बुधवारी त्यांना जळगावातील मुक्ताई निवासस्थानी येऊन भेटले. उदेसिंग पाडवी (शहादा), हरिभाऊ जावळे (रावेर), सुरेश भोळे (जळगाव), उन्मेश पाटील (चाळीसगाव) यांचा त्यात समावेश होता. संजय सावकारे (भुसावळ), गिरीश महाजन (जामनेर) यांनी मंगळवारी रात्रीच खडसे यांची भेट घेतली. धुळ््याचे आमदार अनिल गोटे यांनी खडसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. मात्र खडसे यांनी या सर्वांना पक्षाचा निर्णय अंतिम राहील, लॉबिंग करण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Eknath Khadseneni prevented the farming from the stakeholders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.