एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव

By admin | Published: May 31, 2016 06:50 AM2016-05-31T06:50:53+5:302016-05-31T06:50:53+5:30

एकापाठोपाठ झालेल्या आरोपांमुळे चर्चेत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी चहूबाजूंनी कोंडी केल्यामुळे खडसे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

Eknath Khadse's resignation pressure | एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव

एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव

Next

मुंबई : भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी, ३० कोटींचे लाच प्रकरण, कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमच्या घरातील दूरध्वनीवर झालेले कथित संभाषण, जावयाची लिमोझिन कार आणि सिंचन घोटाळा... अशा एकापाठोपाठ झालेल्या आरोपांमुळे चर्चेत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी चहूबाजूंनी कोंडी केल्यामुळे खडसे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
महसूलमंत्री खडसे यांना मंत्रिपदावरून तत्काळ हटवा, या मागणीसाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनवर गेलेले असतानाच खडसे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर धाव घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बंद दाराआड सुमारे दीड तास चर्चा केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले. राजीनाम्यासाठी खडसे यांच्यावर विरोधकांनी दबाव वाढवला असतानाच पक्षातून त्यांच्या खातेबदलाचे संकेत मिळत आहेत.
खडसेंना मंत्रिपदावरून हटवा
दाऊदच्या घरातील दूरध्वनीवरून झालेले संभाषण, पुणे येथील एमआयडीसीतील जमीन घोटाळा आणि ३० कोटींची लाच ही सर्व प्रकरणे गंभीर असून, त्याची नि:पक्ष चौकशी होण्यासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना तत्काळ
मंत्री पदावरून हटविले पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली.
...तर ‘वर्षा’बाहेर उपोषण
खडसेंविरोधात पुरावे असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारपर्यंत खडसेंचा राजीनामा घ्यावा; अन्यथा वर्षा बंगल्याबाहेर उपोषणाला बसण्याचा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे.
> मुख्यमंत्र्यांनी दिली महसूलमंत्र्यांना समज
यदु जोशी ल्ल मुंबई
‘आपल्यावर होत असलेल्या प्रत्येक आरोपाचे आपण ज्या पद्धतीने खंडन करीत आहात त्यातून आणखी नवे आरोप आपल्यावर होत आहेत. वादळ निर्माण करणारी विधाने टाळा. आपल्यावरील आरोपांना कायदेशीर उत्तर देण्यावर
भर द्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महसूलमंत्री
एकनाथ खडसे यांना समजावल्याचे सूत्रांनी सांगितले.
खडसे यांनी आज वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे या वेळी उपस्थित होते. खडसे हे सोबत फायली घेऊनच आले
होते. त्यांनी एकेक प्रकरणाचा
खुलासा मुख्यमंत्र्यांसमोर केला. ठाणे जिल्ह्यातील जमिनीचे प्रकरण, पुण्यातील एमआयडीसीच्या जमिनीचे प्रकरण, दाऊद इब्राहिमला झालेले कॉल्स या कुठल्याही प्रकरणात आपला काहीही दोष नाही, असे पटवून सांगताना खडसे उद्विग्न झाल्याचे जाणवत होते. खडसेंचे सगळे म्हणणे ऐेकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मीडियासमोर न बोलण्याचा सल्ला दिला. शिवाय, सध्या आपण ज्या पद्धतीने बोलत आहात त्यामुळे अडचणींमध्ये वाढ होत आहे. आपल्यावरील आरोपांचे उत्तर देताना दुसऱ्यांवर हेत्वारोप केले जात असतील तर लोकांची सहानुभूती मिळत नाही, अशी राजकीय ‘शहाण’पणाची जाणीव करून दिली. त्यावर ‘यापुढे आपण काळजी घेऊ,’ असे खडसेंनी सांगितल्याचे कळते.
विस्तारात पंख छाटणार!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजमितीस होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, खडसे यांना लगेच मंत्रिमंडळातून काढले जाणार नाही. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या पुढील महिन्यात होणाऱ्या संभाव्य विस्तारात खडसेंकडील महत्त्वाची किमान तीन खाती काढली जातील, असे समजते.

Web Title: Eknath Khadse's resignation pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.