शिंदे-फडणवीस सरकारचा धडाका; १०० दिवसांत ७००हून अधिक निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 06:03 AM2022-10-08T06:03:26+5:302022-10-08T06:04:25+5:30

या शंभर दिवसांच्या काळात सातशेहून अधिक लाेकाेपयाेगी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले गेले आहेत.

eknath shinde and devendra fadnavis govt took more than 700 decisions in 100 days | शिंदे-फडणवीस सरकारचा धडाका; १०० दिवसांत ७००हून अधिक निर्णय 

शिंदे-फडणवीस सरकारचा धडाका; १०० दिवसांत ७००हून अधिक निर्णय 

googlenewsNext

दीपक भातुसे । लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई:एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकार ३० जून रोजी राज्यात अस्तित्वात आले. शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याला शनिवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत. या शंभर दिवसांच्या काळात सातशेहून अधिक लाेकाेपयाेगी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले गेले आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या निर्णयाचा गाेषवारा…

मुख्यमंत्र्यांकडील विभागाचे महत्त्वाचे निर्णय

- समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढवण्याचा निर्णय
- कुलाबा-वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३ च्या १० हजार कोटींच्या वाढीव खर्चास मान्यता
- मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी ५ हजार ५०० कोटींचा निधी
- धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा मागवण्याचा निर्णय
- नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित ९२७९ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय
- एमएमआरडीएला विविध प्रकल्प राबविण्यासाठी ६० हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास शासन हमी देण्याचा निर्णय

इतर विभागांमधील महत्त्वाचे निर्णय  

- दिवाळीच्या तोंडावर राज्यातील रेशन कार्डधारकांना १०० रुपयांत एक किलो रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल  
- १४ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहन मदत 
- अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २ ऐवजी ३ हेक्टर मर्यादेत वाढीव मदत  
- निकषात बसत नसलेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत
- शंखी गोगलगाईंमुळे बाधित शेतकऱ्यांना ९८ कोटी रुपयांची मदत 
- पेट्रोलच्या करात पाच रुपये आणि डिझेलच्या करात तीन रुपयांची कपात
- पोलिसांच्या ७२३१ पदांच्या भरतीचा निर्णय
- विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांच्या पुनर्गठनाचा निर्णय 
- एमपीएससीच्या कक्षेतील १०० टक्के व कक्षेबाहेरील ५० टक्के पद भरतीचा निर्णय 
- वर्ग ३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे एमपीएससीमार्फत भरण्याचा निर्णय
- पोलिसांच्या नैमित्तिक रजा १२ वरून २० करण्याचा निर्णय

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: eknath shinde and devendra fadnavis govt took more than 700 decisions in 100 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.