Eknath Shinde : "विरोधकांना चोख उत्तर, त्यांची जागा दाखवणारा विजय"; एकनाथ शिंदेंनी निकालानंतर स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 05:42 PM2022-12-20T17:42:59+5:302022-12-20T18:11:06+5:30
Eknath Shinde And Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे.
यंदाच्या ग्राम पंचायत निवडणुका पाच महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरामुळे खूप महत्वाच्या आहेत. सर्वच पक्ष आपणच कशी बाजी मारलीय ते दाखविण्यासाठी आतूर झालेले आहेत. अत्यंत चुरशीचे असे निकाल लागत आहेत. कोणाच्या किती ग्राम पंचायती, कोणाचे किती सरपंच यावरून देखील या पक्षांमध्ये दावे केले जाणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी "विरोधकांना हे चोख उत्तर आहे. त्यांची जागा दाखवणारा आणि युतीच्या कामाची पावती दाखवणारा हा विजय आहे" असं म्हटलं आहे. तसेच "आजच्या ग्रामपंचायतीच्या घवघवीत अशा भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला जे यश मिळालं त्याचं मी अभिनंदन करतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमचे सर्व आमदार, खासदार, मंत्री, कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली त्या सर्वांचं अभिनंदन करतो. मागच्या निवडणुकामध्ये विजय मिळाला. त्याच्या दुप्पट विजय आता मिळाला" असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
People have given a mandate to BJP and Balasahebanchi Shiv Sena in gram panchayat polls. I want to assure people that under PM Modi's leadership, we will continue to serve people: Maharashtra Dy CM Devendra Fadnavis pic.twitter.com/MTrUeTWXY9
— ANI (@ANI) December 20, 2022
"विरोधकांना हे चोख उत्तर आहे. ग्रामीण भागातील लोक, शेतकरी यामध्ये मतदान करतात. विरोधकांना त्यांची जागा दाखवणारा आणि युतीच्या कामाची पावती दाखवणारा हा विजय आहे. शेतकरी, कष्टकरी आणि महिलांचा सन्मान करणारं हे सरकार आहे" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी "जे आमच्या सरकारला नाव ठेवत होते. त्यांना न्यायालयाने सांगितलंच पण महाराष्ट्राच्या जनतेनेही सांगितलं की, हेच कायदेशीर सरकार आहे. मोदींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री शिंदेंचं सरकार हे ग्रामीण जनतेच्या पाठीशी उभं राहील" असं म्हटलं आहे, माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"तिन्ही पक्ष मिळूनही भाजपा इतकी संख्या होत नाही"; नंबर वन आम्हीच असल्याचा भाजपाचा दावा
भाजपाने मोठी झेप घेतली आहे. याच दरम्यान आता भाजपाने नंबर वन आम्हीच असल्याचा दावा केला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी "तिन्ही पक्ष मिळूनही भाजपा इतकी संख्या होत नाही" असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भाजपाचे प्रचंड यश. आतापर्यंत आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपाची जोरदार मुसंडी इतर तीन पक्ष मिळूनही भाजपा इतकी संख्या होत नाही. निकाल अजून येत आहेत तरी #भाजपा_नंबर_1 #भाजपा 1204 #उध्दव ठाकरे गट 124 #काँग्रेस 95 #राष्ट्रवादी 161" असं केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"