Eknath Shinde Cabinet Expansion List: राजभवनातील खुर्च्यांवर नावे लागली; संजय राठोड, अब्दुल सत्तारांसह १८ जण घेणार मंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 10:47 AM2022-08-09T10:47:29+5:302022-08-09T10:54:44+5:30

Eknath Shinde Cabinet Expansion List: शिंदे गटातून मंत्रिमंडळाची नावे ठरत नसल्याचे वृत्त असताना राजभवनात संभाव्य मंत्र्यांच्या नावाची यादी लागली आहे.

Eknath Shinde Cabinet Expansion List: name plate on the chairs in the Rajbhavan; 18 Mlas including Sanjay Rathod, Abdul Sattar will take oath as ministers | Eknath Shinde Cabinet Expansion List: राजभवनातील खुर्च्यांवर नावे लागली; संजय राठोड, अब्दुल सत्तारांसह १८ जण घेणार मंत्रिपदाची शपथ

Eknath Shinde Cabinet Expansion List: राजभवनातील खुर्च्यांवर नावे लागली; संजय राठोड, अब्दुल सत्तारांसह १८ जण घेणार मंत्रिपदाची शपथ

Next

शिंदे गटातून मंत्रिमंडळाची नावे ठरत नसल्याचे वृत्त असताना राजभवनात संभाव्य मंत्र्यांच्या नावाची यादी लागली आहे. यामध्ये संजय राठोड, अब्दुल सत्तारांसह १८ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनातील खुर्च्यांवर नावे लावण्यात आली आहेत.

अब्दुल सत्तार, संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तविली जात होती. असे असताना रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे गटाचे आणखी एक आमदार संजय शिरसाट शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी शिरसाट यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचे समजल्याने त्यांची आणि शिंदे यांची वादावादी झाल्याचे समजते आहे. एबीपी माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे. संजय शिरसाटांचे नाव या खुर्च्यांवर नाहीय. 

राजभवनात जे मंत्री शपथ घेणार आहेत, त्यांची नावे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्च्यांच्या मागे ठेवलेल्या खुर्च्यांवर चिकटविण्यात आली आहेत. शिंदे गटाकडून पहिल्या टप्प्यात शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे. 

भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, विजयकुमार गावित यांना संधी देण्यात आली आहे.

 
 

Web Title: Eknath Shinde Cabinet Expansion List: name plate on the chairs in the Rajbhavan; 18 Mlas including Sanjay Rathod, Abdul Sattar will take oath as ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.