Eknath Shinde Cabinet Expansion: संजय शिरसाट - एकनाथ शिंदेंमध्ये रात्रीच खडाजंगी? मंत्रिपदावरून नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 10:22 AM2022-08-09T10:22:34+5:302022-08-09T10:23:33+5:30

Eknath Shinde Cabinet Expansion: अब्दुल सत्तार, संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. शिंदे गटात मंत्रिमंडळ विस्तारावरून प्रचंड मतभेद झाल्याचे वृत्त आहे. 

Eknath Shinde Cabinet Expansion: Sanjay Shirsat - Eknath Shinde verbal fight at night? Dissatisfaction with the ministry | Eknath Shinde Cabinet Expansion: संजय शिरसाट - एकनाथ शिंदेंमध्ये रात्रीच खडाजंगी? मंत्रिपदावरून नाराजी

Eknath Shinde Cabinet Expansion: संजय शिरसाट - एकनाथ शिंदेंमध्ये रात्रीच खडाजंगी? मंत्रिपदावरून नाराजी

googlenewsNext

मंत्रिमंडळ विस्ताराला काही मिनिटेच शिल्लक असताना एकनाथ शिंदे यांनी तातडीने सह्याद्री अतिथीगृहावर समर्थक आमदारांची बैठक बोलावली आहे. यामध्ये काही मंत्रिपदाच्या नावावरून चर्चा केली जाणार असल्याचे समजते. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहिले आहेत. असे असताना शिंदे गटात मंत्रिमंडळ विस्तारावरून प्रचंड मतभेद झाल्याचे वृत्त आहे. 

Eknath Shinde Cabinet Expansion: एकनाथ शिंदेंच्या गटातील मंत्र्यांची नावे ठरेनात; या चार नावांवर 'वाद' सुरु

Eknath Shinde Cabinet Expansion: मंत्रिपदावर शहाजी बापूंनी गुवाहाटीची आठवण करून दिली; एकनाथ शिंदेंना म्हणालो होतो... 

अब्दुल सत्तार, संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. असे असताना रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे गटाचे आणखी एक आमदार संजय शिरसाट शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी शिरसाट यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचे समजल्याने त्यांची आणि शिंदे यांची वादावादी झाल्याचे समजते आहे. एबीपी माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

रात्री शिंदे यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना देखील शिरसाट यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. संजय शिरसाट यांनी शिंदे यांच्या बंडावेळी ठाकरे कुटुंबीयांवर कठोर शब्दांत टीका केली होती. पत्रही लिहिले होते, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर कठोर शब्दांत टीका केली होती. यामुळे शिरसाट यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. परंतू त्यांचा हिरमोड झाल्याने वाद घालून शिरसाट नंदनवन बंगल्यावरून रात्रीच बाहेर पडले. 

संजय राठोड, सत्तारांचा पत्ता कट? 
दुसरीकडे संजय राठोड आणि अब्दुल सत्तारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. राठोड यांचे ठाकरे सरकार काळातील तरुणीची आत्महत्या प्रकरण आणि सत्तारांच्या मुलींची नावे टीईटी घोटाळ्यात आल्याचे कारण आहे. राठोड यांना शिंदे सरकार आल्या आल्याच पुणे पोलिसांनी क्लिन चिट दिली होती. 
 

Web Title: Eknath Shinde Cabinet Expansion: Sanjay Shirsat - Eknath Shinde verbal fight at night? Dissatisfaction with the ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.