शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार?; NCP नेते एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितली कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 09:27 AM2022-10-13T09:27:49+5:302022-10-13T09:28:25+5:30

सरकार ज्यावेळेस बहुमतात असते तेव्हा निर्णय घेतले जातात ते वैध असतात. परंतु काही संकेत, नियम आपण पाळायचे असतात असं एकनाथ खडसेंनी म्हटलं.

Eknath Shinde- Devendra Fadnavis government will collapse?; NCP leader Eknath Khadse clearly stated the reasons | शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार?; NCP नेते एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितली कारणं

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार?; NCP नेते एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितली कारणं

googlenewsNext

बुलढाणा - सरकार केव्हा कोसळेल हे सांगता येणार नाही. सध्या अधांतरी आहे. अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते यावर सर्व अवलंबून आहे. सरकारची निश्चिचता, अनिश्चितता कोर्टाच्या निर्णयावर आहे. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आमदारांमध्ये असंतोष पसरला तर सरकारला त्यावेळीही धोका पोहचू शकतो. प्रत्येकाला अपेक्षा आहे त्यामुळे प्रत्येकाला संधी देणे अवघड आहे. त्यामुळे सरकार कोसळण्यासाठी बरीच कारणे आहे असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे. 

एकनाथ खडसे(Eknath Khadse) म्हणाले की, सरकार ज्यावेळेस बहुमतात असते तेव्हा निर्णय घेतले जातात ते वैध असतात. परंतु काही संकेत, नियम आपण पाळायचे असतात. अलीकडे सरकारमध्ये येणारे संकेत पायदळी ठेऊनच निर्णय घेतो असं चित्र आहे. पण जे सरकार बहुमत असतं त्याचे निर्णय हे कायद्याने मान्यच असतात. काँग्रेस-राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी भक्कम आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवार उभा केला जाणार आहे असं त्यांनी सांगितले. 

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे दोघांच्या चूका झाल्या
तसेच स्व. बाळासाहेब ठाकरेंनी उभ्या आयुष्यात धनुष्यबाणासाठी जी पुण्याई खर्ची केली. धनुष्यबाणानं त्यांनी अनेक निवडणुका जिंकल्या. सत्तास्थाने प्राप्त केली. परंतु दोघांच्या भांडणात धनुष्यबाणही मोडलं, शिवसेना नावही गेले. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना असं नावं आली. पुढच्या काळात या दोघांपैकी कुणाला यश येईल, अपयश येईल हा भाग वेगळा आहे. मात्र परंपरागत पिढीजात पुर्वजांनी कमावलेले नाव आणि चिन्ह दोघांनीही गमावलं आहे असं खडसे म्हणाले.  

त्याचसोबत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे पक्षप्रमुख होते. एखाद्या पक्षाचा प्रमुख १०० टक्के निर्भिडपणे काम करेलच असं नसतं. मग तो कुणत्याही पक्षाचा असो. कधी ना कधी चूक होऊ शकते. ती चूक दुरुस्तही होऊ शकते. उद्धव ठाकरेंकडूनही चुका झाल्या असतील परंतु इतक्या मोठ्या चुका नाहीत ज्यामुळे पक्ष मोडीत निघेल. आपल्याच घरात आग लावण्याचा हा प्रकार आहे. दोघांच्या हातातून चूका घडल्या आहेत. टोकाची भूमिका घेतली गेली. त्यामुळे आज धनुष्यबाण चिन्ह हे तात्पुरतं का होईना पण नामशेष झाल्याचं चित्र आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी व्यक्त केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Eknath Shinde- Devendra Fadnavis government will collapse?; NCP leader Eknath Khadse clearly stated the reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.