Eknath Shinde: भर पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब-आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 10:18 PM2022-07-04T22:18:13+5:302022-07-04T22:24:05+5:30

Eknath Shinde: यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार आणि इतर अनेक समर्थकही होते. यावेळी शिंदे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वगत करण्यात आले.

Eknath Shinde: Eknath Shinde pays homage at Balasaheb Thackeray and Anand Dighe memorial in heavy rains | Eknath Shinde: भर पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब-आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक

Eknath Shinde: भर पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब-आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक

googlenewsNext

Eknath Shinde: आज विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडले. काल भाजपने अध्यक्षपदाची निवडणुक जिंकली तर आज विश्वास ठरावातही बाजी मारली. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिवसेना(शिंदे गट) यांचे सरकार स्थापन झाले. दरम्यान, आजच्या अधिवेशनानंतर राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भर पावसात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

अनेक दिवसांच्या सत्ता संघर्षानंतर अखेर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी 164 सदस्यांचा पाठिंबा मिळवत बहुमत चाचणी  जिंकली. दरम्यान, आज मुंबईत मुसळधार पाऊ सुरू आहे, अनेक ठिकाणी पाणी तुंबलंय. या अशा पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केले. 

यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार आणि इतर अनेक समर्थकही होते. यावेळी शिंदे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वगत करण्यात आले. यावेळी ढोल ताशांचा गजर, गाण्यांचा आवाज आणि जय भवानी जय शिवाजी, एकनाथ शिंदे आगे बढो अशा घोषणा देण्यात आल्या. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळानंतर शिंदे यांनी त्यांचे गुरू आणि दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या समाधीचेही दर्शन घेतले. स्मारकाला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट ठाण्याकडे रवाना झाले. 

Web Title: Eknath Shinde: Eknath Shinde pays homage at Balasaheb Thackeray and Anand Dighe memorial in heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.