Video: माझी दोन मुलं माझ्या डोळ्यासमोर मेली, त्यावेळी...; एकनाथ शिंदेंनी हुंदके आवरले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 06:29 PM2022-07-04T18:29:02+5:302022-07-04T18:30:35+5:30
Eknath Shinde Emotional Story: एकनाथ शिंदे यांनी नंतर सावरत विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांना चांगलेच टोले हाणले.
माझ्या आयुष्यामध्ये जो दु:खद प्रसंग आला, माझी दोन मुले माझ्या डोळ्यासमोर मेली.... त्यावेळेस मला आधार दिला. दिघे साहेबांनी, आनंद दिघे साहेबांनी मला आधार दिला.... असा एक आयुष्यात आलेला वाईट प्रसंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला. यावेळी त्यांना हुंदके आवरले नाहीत. शिंदे भावूक झाले होते.
शिंदे बोलत होते, बोलत होते, पण तिकडे फडणवीस घाबरलेले; अजित पवारांनी नेमके तेच हेरले
एकनाथ शिंदे यांनी नंतर सावरत विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांना चांगलेच टोले हाणले.
आमचे ७२ तासांत सरकार गेले, अडीच वर्षे मी, अडीच तुम्ही; फडणवीसांनी सांगितली अजित पवारांसोबतची 'डील'
माझं कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. कशासाठी जगायचे, कोणासाठी जगायचे. मी ठरवलं होतं फक्त माझा श्रीकांत, पत्नी आणि आईवडील यांच्यासाठीच मी जगेन. बास माझे आता काही राहिले नाही. मी तिथून बाहेर कोलमडून पडलो तर मला माहित होते आता माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता आहे.
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde breaks down as he remembers his family in the Assembly, "While I was working as a Shiv Sena Corporator in Thane, I lost 2 of my children & thought everything is over...I was broken but Anand Dighe Sahab convinced me to continue in politics." pic.twitter.com/IVxNl16HOW
— ANI (@ANI) July 4, 2022
आनंद दिघे साहेब माझ्याकडे एकदा, दोनदा, तिनदा... पाचवेळा आले. साहेबांना मी सांगितले आता मी नाही उभा राहू शकत. मी संघटनेला न्याय नाही देऊ शकत. मला त्यांनी एक दिवस रात्री टेंभी नाक्यावर बोलविले. एकनाथ तू नाही म्हणून नकोस. तुला आता हे दु:ख पचवावेच लागेल. तुझ्या डोळ्यातले अश्रू पुसावे लागतील, असे एकनाथ शिंदे यांनी भावूक होत सांगितले.