Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 05:31 PM2024-11-27T17:31:30+5:302024-11-27T17:32:26+5:30
Eknath Shinde Maharashtra CM Post, Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री कोणाचा असेल यावरून चर्चा रंगली. भाजपाचा मुख्यमंत्री होणार या चर्चेने एकनाथ शिंदे नाराज आहेत का, अशी कुजबूज सुरु होती. अखेर या चर्चांवर शिंदे यांच्या पत्रकार परिषदेने पडदा पडला.
Eknath Shinde Maharashtra CM Post, Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. २३ नोव्हेंबरला त्याचा निकाल आला आणि महायुतीला मोठे बहुमत मिळाले. भाजपाने प्रथमच १३० पेक्षा जास्त जागा जिंकल्या. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांनीही मोठी मुसंडी मारली. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री कोणाचा असेल यावरून चर्चा रंगली. भाजपाचा मुख्यमंत्री होणार या चर्चेने एकनाथ शिंदे नाराज आहेत का, अशी कुजबूज सुरु होती. अखेर या चर्चांवर शिंदे यांच्या पत्रकार परिषदेने पडदा पडला. मुख्यमंत्रीपदाबाबत महायुतीचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच, यापुढचा फ्युचर प्लॅन काय असेल याचे त्यांनी शायरीतून उत्तर दिले.
“मी महायुतीतील घटक आहे. आम्हाला मोठे बहुमत मिळाले आहे. मी कालच महायुतीच्या पक्षश्रेष्ठींना फोन करून कळवले आहे की महायुती बळकट करण्यासाठी माझा तुमच्या निर्णयाला पाठिंबा असेल. आम्ही कायमच महायुतीसोबतच राहू. आमच्या सरकारमध्ये लाडकी बहिण योजना राबवल्याने मी संपूर्ण राज्यातील बहिणींचा लाडका भाऊ झालो. तेच पद माझ्यासाठी सर्वात मोठे आहे. माझ्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार बनवण्यात कुठलाही अडथळा येणार नाही”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
शायरीतून सांगितला ‘फ्युचर प्लॅन’
मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्याचे सांगताच, एकनाथ शिंदे यांचा पुढचा प्लॅन काय? असा सवाल पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले-
“जीवन में असली उड़ान अभी बाकी है,
अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन,
अभी तो सारा आसमान बाकी है…
आपण खूप काम केले आहे. आम्ही केलेलं काम तुमच्या समोर आहे. यापुढे महायुती म्हणून काम करायचं आहे. आम्हाला मिळालेले बहुमत जितके मोठे आहे तितकेच आमची जबाबदारीही वाढली आहे. यापुढे महायुती आणखी काम करत राहणार आहोत,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपला ‘फ्युचर प्लॅन’ सांगितला.