Maharashtra Political Crisis: मुंबईनंतर ‘ही’ महानगरपालिका टार्गेटवर! शिंदे गट लागला कामाला; शिवसेनेला कडवे आव्हान देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 01:06 PM2022-08-23T13:06:12+5:302022-08-23T13:07:16+5:30

Maharashtra Political Crisis: राज्यभरातून वाढत्या पाठिंब्यानंतर आता शिंदे गट संघटना मजबूत करण्यासाठी आक्रमकपणे पावले टाकताना पाहायला मिळत आहे.

eknath shinde group active in pune for upcoming municipal elections 2022 to give tough fight to shiv sena uddhav thackeray | Maharashtra Political Crisis: मुंबईनंतर ‘ही’ महानगरपालिका टार्गेटवर! शिंदे गट लागला कामाला; शिवसेनेला कडवे आव्हान देणार

Maharashtra Political Crisis: मुंबईनंतर ‘ही’ महानगरपालिका टार्गेटवर! शिंदे गट लागला कामाला; शिवसेनेला कडवे आव्हान देणार

Next

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) एकामागून एक बैठकांचा सपाटा सुरू असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. दुसरीकडे पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. शिंदे गटाला पाठिंबा वाढत असल्याचे दिसत आहे. केवळ शिवसेना नाही, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता मुंबईनंतर आता आणखी एका महानगरपालिकेकडे शिंदे गटाने लक्ष्य केंद्रीत केल्याचे सांगितले जात आहे. 

एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक शहरात शिवसेनेत उघड फूट पडल्याचे चित्र दिसले. पुण्यातही शिंदे गटाला मोठ समर्थन मिळाले. तीन टर्म नगरसेवक राहिलेले प्रमोद भानगिरे यांनी सर्वांत आधी पुण्यातून शिंदे गटाला समर्थन दिले. त्यानंतर अजय भोसले, किरण साळी असे अनेक नेते शिंदे गटात सामील झाले. आता येणारी महापालिका निवडणूक पाहता पुण्यातील शिंदे गटाने संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे.

पुण्यातील संघटन मजबूत करण्यावर 

शिंदे गटाची शिवसेना पुण्यात मजबूत व्हावी, यासाठी शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, सहसंपर्कप्रमुखपदी अजय भोसले यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता विधानसभा निहाय उपशहर प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी सांगितले आहे. आगामी पुणे महापालिकेची निवडणूक पाहता आठही विधानसभा मतदारसंघात उपशहर प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

दरम्यान, पुण्यातील मध्यवर्ती भागात प्रति शिवसेना उभारणार असल्याची घोषणा शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी केली होती. त्यानंतर आता संघटनात्मक वाढीला आणखी जोर दिल्याने शिंदे गट पुण्यात आपली ताकद वाढवत असल्याचे चित्र आहे. 
 

Web Title: eknath shinde group active in pune for upcoming municipal elections 2022 to give tough fight to shiv sena uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.