Maharashtra Political Crisis: “संभाजीराजेंना उमेदवारी न देणे ही गद्दारी नाही का?”; शिंदे गटाचा शिवसेनेला रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 12:08 PM2022-08-29T12:08:15+5:302022-08-29T12:09:04+5:30

Maharashtra Political Crisis: विधान भवन परिसरात विरोधकांपैकी घोषणा न देणारे काही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे.

eknath shinde group minister uday samant criticised shiv sena and aaditya thackeray | Maharashtra Political Crisis: “संभाजीराजेंना उमेदवारी न देणे ही गद्दारी नाही का?”; शिंदे गटाचा शिवसेनेला रोखठोक सवाल

Maharashtra Political Crisis: “संभाजीराजेंना उमेदवारी न देणे ही गद्दारी नाही का?”; शिंदे गटाचा शिवसेनेला रोखठोक सवाल

Next

Maharashtra Political Crisis: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. यातच शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र होताना पाहायला मिळत आहे. शिंदे गट आणि ठाकरे सेनेत आरोप-प्रत्यारोप तीव्र होत असून, संभाजीराजेंना नाकारलेली उमेदवारी ही गद्दारी नाही का, अशी विचारणा शिंदे गटातील मंत्र्याने केली आहे. 

प्रतिशिवसेना भवन उभारण्यात येणार म्हणत सहानुभूती मिळविण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू असल्याचे नवनिर्वाचित उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. तसेच संभाजीराजेची उमेदवारी नाकारणे ही गद्दारी होऊ शकत नाही का? असा सवाल उदय सामंत यांनी केला आहे. प्रति शिवसेना भवन उभारण्याचा कोणताही संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला नसून मध्यवर्ती कार्यालय असावे अशी भूमिका असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे, याचा पुनरुच्चार उदय सामंत यांनी यावेळी बोलताना केला. राज्यात स्थापन झालेल्या भाजप-सेना सरकारमधील एकनाथ शिंदे गटातील शिवसेना समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थिती लावली होती. 

आम्ही शिंदे साहेबांचे नेतृत्व स्वीकारले

विधानभवनाबाहेर झालेल्या बाचाबाची दरम्यान घोषणा न देणाऱ्या विरोधकांमधील काही हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीचे दरवाजे उघडे असल्याचे आवाहन केले असले तरीही आम्ही एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले असून त्यांचा निर्णय बंधनकारक आहे, असे उदय सामंत यांनी नमूद केले. घटनापीठाकडे जे प्रकरण सुरू आहे त्यावर जाहीरपणाने बोलणे योग्य नसल्याचे उदय सामंत म्हणाले. 

दरम्यान, आगामी काही दिवसात शिवसेनेची निशाणी आम्ही घेणार असून घटनापीठाकडे गेलेला वाद हा आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता नाही. आपण पुन्हा निवडून येणार असल्याचा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मिशन आपण तोडले असून येत्या निवडणुकीत भाजप-सेना २००चा आकडा पार करण्याचा चमत्कार करणार असल्याचा दावा भरत गोगावले यांनी यावेळी केला. 
 

Web Title: eknath shinde group minister uday samant criticised shiv sena and aaditya thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.