खुद्द शिंदेंनाही मुख्यमंत्री पदाची कल्पना नसेल, पण फडणवीस...; शरद पवारांनी व्यक्त केले आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 08:45 PM2022-06-30T20:45:34+5:302022-06-30T20:52:16+5:30

Sharad Pawar Reaction on Eknath Shinde's CM Oath:  शिंदे जे मुख्यमंत्री झाले, ते ठाण्याचे आहेत. अनेक वर्षे त्यांचे ठाण्यात काम आहे. परंतू ते मुळचे सातारचे आहेत. यशवंतराव चव्हाण हे सातारचे होते. मी मुख्यमंत्री झालो, मी देखील सातारचाच आहे, असे शरद पवार म्हणाले, यातच त्यांनी फडणवीसांवरून छेडले आहे.

Eknath Shinde himself may not have an idea of the post of Chief Minister, but BJP's Order is Order Devendra Fadanvis is also not happy; Sharad Pawar expressed surprise | खुद्द शिंदेंनाही मुख्यमंत्री पदाची कल्पना नसेल, पण फडणवीस...; शरद पवारांनी व्यक्त केले आश्चर्य

खुद्द शिंदेंनाही मुख्यमंत्री पदाची कल्पना नसेल, पण फडणवीस...; शरद पवारांनी व्यक्त केले आश्चर्य

googlenewsNext

शिवसेनेतून जे आमदार गेले त्यांची नेतृत्व बदलाची मागणी होती. एकनाथ शिंदे हे सातारचे आहेत. याआधीही चार मुख्यमंत्री साताऱ्याने पाहिले आहेत. त्यात मी देखील आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. याचबरोबर पवारांनी आजच्या या घडामोडी आश्चर्यकारक होत्या असे म्हटले. 

पहिले आश्चर्य म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भाजपामध्ये एक आहे, दिल्लीतून आदेश असो की नागपूरहून त्यात तडजोड नसते. या आदेशात राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी शिंदेंवर पडली, कदाचित त्याची कल्पना शिंदेंनाही नव्हती, अशा शब्दांत शरद पवारांनी आपल्यालाही या निर्णयाचे आश्चर्य वाटल्याचे म्हटले. 

दुसरे आश्चर्य म्हणजे, भाजपाच्या पक्ष श्रेष्ठींचा आदेश असतो तो पाळावा लागतो. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी लागली. हे मोठे उदाहरण. मुख्यमंत्री होते, विरोधी पक्षनेते होते, असे असताना त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले, असे पवार म्हणाले.  सत्ता आली की मिळेल ती संधी स्वीकारायची असते हे फडणवीसांनी दाखवून दिले, असेही पवार म्हणाले. 

तिसरी गोष्ट अशी की , शंकरराव चव्हाण अर्थमंत्री होते, त्यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा शंकरराव माझ्या मंत्रिमंडळात आले. अशोकराव चव्हाण देखील मुख्यमंत्री होते, त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे अशी उदाहरणे महाराष्ट्रात घडलेली आहेत. यामुळे फडणवीसांची स्वीकृती मला आश्चर्याची वाटली नाही, असेही पवार म्हणाले. परंतू फडणवीसांचा चेहरा काही वेगळेच सांगत होता, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता, आरएसएसच्या संस्कारांमुळे त्यांनी ते स्वीकारले, असे पवार म्हणाले. कदाचित हे ठरवून केले गेले असेल, अशी शंकाही पवारांनी व्यक्त केली. 

 शिंदे जे मुख्यमंत्री झाले, ते ठाण्याचे आहेत. अनेक वर्षे त्यांचे ठाण्यात काम आहे. परंतू ते मुळचे सातारचे आहेत. यशवंतराव चव्हाण हे सातारचे होते. मी मुख्यमंत्री झालो, मी देखील सातारचाच आहे. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे सातारचेच होते, असेही पवार म्हणाले. ३९ लोक बाहेर पडले त्

Web Title: Eknath Shinde himself may not have an idea of the post of Chief Minister, but BJP's Order is Order Devendra Fadanvis is also not happy; Sharad Pawar expressed surprise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.