Eknath Shinde : कोणत्या जिल्ह्यातून किती आमदार शिंदेसेनेसोबत? जाणून घ्या संपूर्ण लिस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 12:07 PM2022-06-23T12:07:43+5:302022-06-23T12:10:36+5:30

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे.

Eknath Shinde : How many MLAs from which district are with Eknath Shinde group? Find out the full list ... | Eknath Shinde : कोणत्या जिल्ह्यातून किती आमदार शिंदेसेनेसोबत? जाणून घ्या संपूर्ण लिस्ट...

Eknath Shinde : कोणत्या जिल्ह्यातून किती आमदार शिंदेसेनेसोबत? जाणून घ्या संपूर्ण लिस्ट...

googlenewsNext

मुंबई : राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. शिवसेनेला खिंडार पाडत एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठिशी उभा केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, आणखी काही आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचे समोर येत आहेत. अशात आता कोणत्या जिल्ह्यातून किती आमदार एकनाथ शिंदे यांच्यसोबत आहेत, ते पाहूया....

एकनाथ शिंदे गटात सामील आमदारांची नावे आणि मतदारसंघ...

जिल्हा - ठाणे 
एकनाथ शिंदे - कोपरी-पाचपाखडी 
प्रताप सरनाईक - ओवळा-माजिवडा 
बालाजी किणीकर - अंबरनाथ 
शांताराम मोरे - भिवंडी ग्रामीण 
विश्वनाथ भोईर - कल्याण पश्चिम 

जिल्हा - औरंगाबाद
संजय शिरसाट - औरंगाबाद पश्चिम 
रमेश बोरनारे - वैजापूर 
प्रदीप जैस्वाल - औरंगाबाद मध्य 
अब्दुल सत्तार - सिल्लोड 
संदीपान भुमरे - पैठण 

जिल्हा - जळगाव
लता सोनवणे - चोपडा 
किशोर पाटील- पाचोरा 
चिमणराव पाटील - एरंडोल 
गुलाबराव पाटील - जळगाव ग्रामीण 
चंद्रकांत पाटील (अपक्ष) - मुक्ताईनगर

जिल्हा - रायगड
महेंद्र दळवी - अलिबाग 
महेंद्र थोरवे - कर्जत 
भरत गोगोवले - महाड

जिल्हा - उस्मानाबाद
डॉ. तानाजी सावंत - परंडा
ज्ञानराज चौगुले -उमरगा-लोहारा 

जिल्हा - अमरावती
बच्चू कडू (प्रहार संघटना) - अचलपूर 
राजकुमार पटेल (प्रहार संघटना) - मेळघाट

जिल्हा -सातारा
शंभुराज देसाई - पाटण
महेश शिंदे - कोरेगाव

जिल्हा - मुंबई 
यामिनी जाधव - भायखळा 
प्रकाश सुर्वे - मागाठाणे 
सदा सरवणकर - दादर-माहिम
मंगेश कुडाळकर - कुर्ला नेहरुनगर

जिल्हा -  कोल्हापूर
राजेंद्र पाटील -शिरोळ 
प्रकाश आबिटकर - राधानगरी

जिल्हा - नांदेड
बालाजी कल्याणकर - नांदेड उत्तर 

जिल्हा - यवतमाळ
संजय राठोड - दिग्रस

जिल्हा - बुलडाणा
संजय रायमुलकर - मेहकर 
संजय गायकवाड - बुलडाणा 

जिल्हा - पालघर
श्रीनिवास वनगा - पालघर 

जिल्हा - नाशिक
सुहास कांदे - नांदगाव 
दादा भुसे - मालेगाव बाह्य

जिल्हा - भंडारा
नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) -भंडारा

जिल्हा - सोलापूर 
शहाजी पाटील - सांगोला 

जिल्हा - सांगली 
अनिल बाबर - खानापूर

जिल्हा - रत्नागिरी
योगेश कदम-  दापोली 

जिल्हा - सिंधुदुर्ग
दीपक केसरकर - सावंतवाडी 

जिल्हा - धुळे
मंजुळा गावित (अपक्ष) - साक्री

Web Title: Eknath Shinde : How many MLAs from which district are with Eknath Shinde group? Find out the full list ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.