नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 02:45 PM2020-09-24T14:45:47+5:302020-09-24T15:17:58+5:30
मागील कित्येक दिवसांपासून ते स्वतः कोविड केअर सेंटर मध्ये पीपीई किट घालून जात होते.
ठाणे : महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना देखील आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनीही याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. ते म्हणाले, "काल मी माझी कोविड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती."
दरम्यान, मागील कित्येक दिवसांपासून ते स्वतः कोविड केअर सेंटर मध्ये पीपीई किट घालून जात होते. भिवंडीची दुर्घटना असो किंवा रायगडमध्ये आलेला पूर असो अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वतः जाऊन भेटी दिल्या आहेत. ठाण्याचे सिव्हिल रुग्णालय, ठाण्याचे कोविड सेंटर, कल्याण आणि नवी मुंबई येथील सेंटरमध्ये जाऊन त्यांनी स्वतः पीपीई कीट घालून रुग्णांची चौकशी केली. तसेच, त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार सुरू आहेत का? याची शहानिशा करून घेतली. परंतु आता त्यांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी बातम्या..
-"माझे घर पाडण्यापेक्षा 'त्या' इमारतीकडे लक्ष दिले असते तर...", कंगनाचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- PM Kisan Scheme : ५.९५ लाख खात्यांची चौकशी, ५.३८ लाख लाभार्थी नकली; आता काय करणार मोदी सरकार?
- सुरेश अंगडी यांच्यावर दिल्लीत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
- बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?
- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज
- मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो
- मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी