Eknath Shinde: विरोधकांची मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाची सूचना; निर्णय निलम गोऱ्हेंसमोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 07:20 AM2023-03-02T07:20:26+5:302023-03-02T07:21:35+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘बरे झाले देशद्रोह्यांसोबत चहापान टळले’,  असे विधान केले होते.

Eknath Shinde: Opposition's suggestion of disenfranchisement against Chief Minister; Decision before Nilam Gore vidhan parishad | Eknath Shinde: विरोधकांची मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाची सूचना; निर्णय निलम गोऱ्हेंसमोर

Eknath Shinde: विरोधकांची मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाची सूचना; निर्णय निलम गोऱ्हेंसमोर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘बरे झाले देशद्रोह्यांसोबत चहापान टळले’,  असे विधान केले होते. संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाबाबत सत्ताधारी आक्रमक झाल्याने आता या विधानाचा आधार घेत विरोधकांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे हक्कभंगाची सूचना दिली आहे. 
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ही सूचना दाखल झाल्याने गुरुवारी पुन्हा परिषदेत यावरून घमासान होणार आहे.

राज्याचा प्रमुखपदी असलेल्या एका लोकप्रतिनिधीने असे विधान केल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून माझा आणि सार्वभौम सभागृहाचा विशेषाधिकार भंग आणि अवमान झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर, मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव देत आहे, असे पत्र अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हे यांना दिले आहे.

विरोधी पक्षातील आमदार शशिकांत शिंदे, अभिजीत वंजारी, सचिन अहिर, सुनील शिंदे, राजेश राठोड, वजाहत मिर्झा, सतेज पाटील आदींनी या हक्कभंग सूचनेसंदर्भात उपसभापतींची भेट घेतली.

Web Title: Eknath Shinde: Opposition's suggestion of disenfranchisement against Chief Minister; Decision before Nilam Gore vidhan parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.