Eknath Shinde: ४२ आमदारांसह एकनाथ शिंदेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन; पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 02:03 PM2022-06-23T14:03:48+5:302022-06-23T14:27:20+5:30
महाविकास आघाडी सरकारविरोधात या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गुवाहाटी - मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे अपक्ष मिळून ४२ आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ १८ आमदार असल्याचं कळतंय. गुवाहाटीच्या हॉटेलमधून एकनाथ शिंदे यांनी आमदारांचे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने घोषणा दिली जात होती. शिंदे गटात सहभागी असलेले आमदार उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याचं प्रखरतेने दिसून येते.
या आमदारांचा व्हिडिओ पाहिला तर कुठल्याही आमदाराला बळजबरीने डांबून ठेवल्याचं दिसत नाही. महाविकास आघाडी सरकारविरोधात या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशीच भूमिका शिवसेनेच्या या आमदारांची आहे. दुसरीकडे बंडखोर आमदारांमध्ये आणखी काही आमदार सहभागी होणार असल्याचं पुढे येत आहे. एकनाथ शिंदे गटाने विधानसभेच्या उपाध्यक्षांना पत्र पाठवून आम्हीच खरी शिवसेना आहोत असं म्हटलं आहे. तर गटनेतेपदी उपाध्यक्ष नाना झिरवाळ यांनी अजय चौधरी यांच्या नेमणुकीला मान्यता दिली आहे.
गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं शक्तीप्रदर्शन, ४२ आमदारांचा शिंदेंना पाठिंबा #Shivsena#EknathShindepic.twitter.com/fNQasdsUKj
— Lokmat (@lokmat) June 23, 2022
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची कल्पना आधीच होती
एकनाथ शिंदे सहा महिन्यापासून बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचं समोर आले. इतकेच नाही उद्धव ठाकरे यांना ५-६ वेळा गृहमंत्रालयाकडून शिंदे यांच्या हालचालीची माहिती देण्यात आली होती. परंतु इंटेलिजन्सचा रिपोर्ट मिळूनही उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केल्याने शिवसेनेवर ही परिस्थिती आल्याचं सांगितले जात आहे. गुप्तचर विभागाने महाराष्ट्रातील राजकीय संकटाची कल्पना २ महिन्यापूर्वीच सरकारला दिली होती. परंतु कुठलीही कारवाई झाली नाही असा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. २ महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्यासह ८ ते १० आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली होती.
वर्षाची दार आमच्यासाठी बंद होती
काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे अशा शब्दात बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहिलं.