"दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने...", नारायण राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 02:06 PM2022-06-22T14:06:09+5:302022-06-22T14:06:16+5:30

"शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा त्याला आनंद झाला असेल."

Eknath Shinde revolt: Maharashtra Political Crisis: Narayan Rane lashes out at Sanjay Raut | "दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने...", नारायण राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

"दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने...", नारायण राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

Next

Maharashtra Political Crisis: विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण जबरदस्त ढवळून निघाले आहे. यामुळे शिवसेनेतील नाराजीही आता उघड झाली आहे. यातच, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.


विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठी बंडखोरी पाहायला मिळाली आहे. सेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे 35-40 आमदारांना घेऊन गुजरातला गेले, त्यानंतर तेथून गुवाहाटी येथे दाखल झाले आहे. यातच नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. नारायण राणे ट्विटमधून म्हणतात की, "संजय राऊत खुश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने," अशी खोचक शब्दात टीका केली.

'स्वाभिमान जागृत झाला म्हणून बंड पुकारले' 
कालही नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेतून या प्रकरणावर भाष्य केले होते. "अपमानित करणे, तुला मुख्यमंत्री बनवतो, असे दहा वेळा सांगून त्यांना निवडणुकीत, तसेच काही इतर घटनांमध्ये खर्च करायला सांगायचे आणि नंतर आपणच मुख्यमंत्री व्हायचे, फसवणूक करायची, असे अनेक वेळा एकनाथ शिंदेंबद्दल घडले आहे. यातून शेवटी त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि म्हणून त्यांनी हे बंड पुकारले असेल", असे नारायण राणे यांनी म्हटले होते. 

Web Title: Eknath Shinde revolt: Maharashtra Political Crisis: Narayan Rane lashes out at Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.