शिंदे+भाजप, शिवसेना+भाजप...महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 'हे' 5 पर्याय...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 11:31 AM2022-06-22T11:31:44+5:302022-06-22T12:36:51+5:30
Eknath Shinde Revolt: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेसाठी पाच पर्याय दिसत आहेत.
Maharashtra Political Crisis: विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठी बंडखोरी पाहायला मिळाली आहे. सेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे 35 आमदारांना घेऊन गुजरातला गेले, त्यानंतर तेथून गुवाहाटी येथे दाखल झाले आहे. त्यांच्या बंडखोरीमुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी पाच पर्याय समोर येत आहेत.
सरकार स्थापनेसाठी 5 पर्याय...
- एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने भाजपने सरकार स्थापन करावे.
- शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे.
- शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची समजून घालून परत बोलवावे.
- शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करावी आणि बंडखोर आमदारांनी पक्षात परतावे.
- फ्लोअर टेस्टमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला पाहिजे.
फ्लोअर टेस्ट कशी होईल?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना एक पत्र फॅक्स करू शकतात. महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा नसलेल्या सुमारे 40 आमदारांचा दावा ते या पत्राद्वारे मांडू शकतात. या पत्राच्या आधारे, राज्यपाल फ्लोर टेस्टवर निर्णय घेतील. तिथे उद्धव सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल.
शिंदे-भाजप सरकार कसे स्थापन करणार?
एकनाथ शिंदे दोन तृतीयांश आमदारांची संख्या पार करण्यासाठी मुंबईतील शिवसेनेच्या आणखी काही आमदार जोडण्याच्या प्रयत्नात आहेत. शिंदे यांना यात यश येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या शिंदे यांच्या बाजूने 40 आमदार आहेत. भाजप+ कडे 113 आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा असून येथील बहुमताचा आकडा 145 आहे. शिंदे यांचा भाजपला पाठिंबा मिळाल्यास बहुमताचा आकडा 154 च्या पुढे जाईल.