विठ्ठलाची महापूजा उद्धव ठाकरेच करणार? विश्वास प्रस्तावाबाबत न्यायालय काय म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 03:56 PM2022-06-27T15:56:54+5:302022-06-27T16:02:26+5:30
Maharashtra political Crisis: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. शिंदे आपल्यासोबत सेनेच्या 40 आमदारांसह मविआच्या 50 आमदारांना घेऊन गेल्याने सरकार कोसळण्याची शक्यता आहे.
Maharashtra political Crisis: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. शिंदे आपल्यासोबत सेनेच्या 40 आमदारांसह मविआच्या 50 आमदारांना घेऊन गेल्याने सरकार कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी शिवसेनेने नोटीस पाठवली, याविरोधात शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. 11 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.
विठल्लाची पुजा उद्धव ठाकरे करणार..?
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सरकार कोसळणार असे म्हटले जात आहे. या बंडाच्या दिवसापासून पंढरपुरात आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा भाजप नेते देवेंद्र फडणवीस करणार, असे म्हटले जात आहेत. सोशल मीडियावरही याचीच चर्चा होत आहे. पण, आता कोर्टाने 11 जुलैला पुढील सुनावणी ठेवली असल्याने, उद्धव ठाकरेच 10 जुलै रोजी विठ्ठलाची महापूजा करतील, असेही आता म्हटले जात आहे. पण, यात एक मोठी अडचण आहे, ती म्हणजे फ्लोअर टेस्टची.
Supreme Court, in an interim direction, allows Eknath Shinde and other rebel MLAs to file a reply to the disqualification notice issued to them by Deputy Speaker by July 11th, 5.30 pm. Earlier, Deputy Speaker had granted them time to file a reply by today.
— ANI (@ANI) June 27, 2022
फ्लोअर टेस्ट झाल्यावर काय होईल?
कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जुलै रोजी ठेवली आहे. पण, त्यापूर्वी शिंदे गटातील आमदार सरकारमधील आपला पाठिंबा काढून घेऊ शकतात. त्यामुळे सरकार कधीही कोसळू शकते, असे म्हटले जात आहे. याबाबत कोर्टाने म्हटले की, आमच्याकडे फ्लोअर टेस्ट बाबतचे प्रकरण आले, त्यामुळे आम्ही त्यावर बोलू शकत नाही. त्या प्रक्रियेत काही अयोग्य घडले असे कुणा पक्षकाराला वाटले तर ते दाद मागू शकतात, तेव्हाच आम्ही त्याची दखल घेऊ. त्यामुळे शिंदे गटाने 11 जुलैपूर्वीच अविश्वास प्रस्ताव दाखल केला तर सरकार कोसळू शकते.
आज कोर्टात काय झाले?
आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना पक्षप्रमुख, राज्य सरकार, विधिमंडळ सचिवालय, केंद्र सरकार यांना 5 दिवसात उत्तर देण्यासाठी नोटीस जारी करण्यात आलेली आहे. जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत 16 आमदारांना आपले उत्तर दाखल करण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने दिली. 11 जुलैला पुढील सुनावणी होईपर्यंत शिंदे गटातील आमदारांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. 11 जुलै 5.30 पर्यंत 16 आमदारांना आपले म्हणणे मांडण्याची मुभा देण्यात आली आहे.