"स्वतःचे आमदार सांभाळता आले नाही, नाचता येईना अंगण वाकडे", सुधीर मुनगंटीवारांचा राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 07:50 PM2022-06-26T19:50:32+5:302022-06-26T19:51:04+5:30

Maharashtra Political Crisis: 'दिल्लीच्या बापाच्या नावाने मत मागवून दाखवा', अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.

Eknath Shinde Revolt | Maharashtra Political Crisis | "They couldn't take care of their own MLAs, Sudhir Mungantiwar slammed Sanjay Raut | "स्वतःचे आमदार सांभाळता आले नाही, नाचता येईना अंगण वाकडे", सुधीर मुनगंटीवारांचा राऊतांना टोला

"स्वतःचे आमदार सांभाळता आले नाही, नाचता येईना अंगण वाकडे", सुधीर मुनगंटीवारांचा राऊतांना टोला

Next

Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 50 आमदार घेऊन गेल्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बंडखोर आमदारांवर टीका करताना, 'दिल्लीच्या बापाच्या नावाने मत मागवून दाखवा', अंस म्हणाले होते. या टीकेला आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी चोख उत्तर दिले आहे.

'आदित्य ठाकरेंसाठी कोणाला मत मागितले...'
मीडियाशी संवाद साधताना मुनगंटीवार म्हणाले, "कुणी कुणाच्या बापाच्या नावाने मत मागितली, हे सगळ्यांना माहीत आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा नुवडणुकीत कोणाच्या नावाने मत मागितले, हे सर्वाना माहीत आहे. जनतेने कोणाला मते द्यायचे हा जनतेचा अधिकार आहे. संजय राऊत रोज खालच्या शब्दात बोलून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली नेण्याचे काम करत आहेत,'' अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.  

'तुमचे आमदार सांभाळता आले नाही'
ते पुढे म्हणाले, "तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाही आणि भाजपवर आरोप करत आहात. नाचता येईना अंगण वाकडे अशी परिस्थिती शिवसेनेची आहे. तुमच्या अहंकाराला कंटाळून सेनेच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली, त्यात दोष भाजपला देण्याची गरज नाही. सरकार जात असताना आता यांना आता काश्मिरी पंडीत आठवले, स्वातंत्रवीर सावरकर आठवतील आता. अशा लोकांची बौध्दिकता तपासली पाहिजे," अशी खोचक टीकाही मुनगंटीवारांनी केली. 

Web Title: Eknath Shinde Revolt | Maharashtra Political Crisis | "They couldn't take care of their own MLAs, Sudhir Mungantiwar slammed Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.