शिंदे गटानं अद्याप पाठिंबा काढला नाही; 'मविआ' सरकार मजबूत, जयंत पाटलांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 06:03 PM2022-06-24T18:03:02+5:302022-06-24T18:03:44+5:30

एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे यामध्ये वेगळं काही आहे असं वाटत नाही.

Eknath Shinde Revolt: The Shinde Group has not yet withdrawn its support; 'MVA government strong, NCP Jayant Patil | शिंदे गटानं अद्याप पाठिंबा काढला नाही; 'मविआ' सरकार मजबूत, जयंत पाटलांचा विश्वास

शिंदे गटानं अद्याप पाठिंबा काढला नाही; 'मविआ' सरकार मजबूत, जयंत पाटलांचा विश्वास

googlenewsNext

मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार नाराज आहेत. परंतु अजून अधिकृतपणे सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेतलेला नाही. त्यामुळे सरकार अस्तित्वात आहे. सरकारचं कामकाज सुरू आहे. प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्यांचा परिणाम होण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे असं चित्र नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. 

जयंत पाटील म्हणाले की, जे आमदार गुवाहाटीला गेले आहेत त्यापेक्षा वेगळं काही महत्व यामध्ये नाही. राष्ट्रवादीसोबत नको अशी भूमिका शिवसेना आमदारांची आहे असे प्रसारमाध्यमातून पाहत आहोत. त्यांना वेगळं व्हायचं असेल तर काही कारणं द्यावी लागतात त्याप्रमाणे ते कारणं देत आहेत आम्हीही अशी कारणं देऊ शकतो मात्र आम्ही अशी कारणं देणार नाही. सरकारमधून बाजुला होण्यासाठी किंवा महाविकास आघाडीतून बाजुला होण्यासाठी अडीच वर्ष एकत्र राहिल्यावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरू असताना अशाप्रकारची कारणं देणं चुकीचं असल्याचं पाटील म्हणाले.

तसेच बंडखोर शिवसेना आमदारांनी पाठिंबा काढला आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सरकारचा पाठिंबा कुणी काढलाय त्यांची नाराजी सुरू आहे. सरकारचा पाठिंबा कुणी काढलेला नाही. तुम्ही पाठिंबा काढायला उद्युक्त का करताय असा उलट सवाल जयंत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींनी केला. शिवाय त्यांनी पाठिंबा काढला असेल तर कागद दाखवा. ते आपलं मत व्यक्त करत आहेत. एकनाथ शिंदे यांचा जय बोलत आहेत. एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे यामध्ये वेगळं काही आहे असं वाटत नाही. जे गेले आहेत ते परत येतील. उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेत नाही तोपर्यंत सरकारला कोणतीही भीती आहे असं वाटत नाही असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

नारायण राणेंना टोला
नारायण राणे यांना कितीतरी वेळा पवारसाहेबांनी संकटकाळात सहकार्य केले आहे. पाठिंबा दिला आहे. त्याचे स्मरण जरी त्यांनी केले तरी त्यांना वाटेल आपण केलेले विधान मागे घ्यावे असा टोला जयंत पाटील यांनी नारायण राणेंना लगावला आहे. 

Web Title: Eknath Shinde Revolt: The Shinde Group has not yet withdrawn its support; 'MVA government strong, NCP Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.