Sanjay Raut: 'एकनाथ शिंदे कडवट शिवसैनिक, फसवणूक करुन आमदारांना घेऊन गेले', संजय राऊतांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 11:19 AM2022-06-21T11:19:56+5:302022-06-21T11:29:59+5:30

Sanjat Raut: 'अनेक आमदारांना गुजरातला नेले, गुजरातचे प्रदेशाध्यक्ष त्यांची व्यवस्था करत आहेत. यातून हे षडयंत्र असल्याचे दिसत आहे.'

Eknath Shinde | Sanjay Raut | 'Eknath Shinde is true Shiv Sainik', says Sanjay Raut | Sanjay Raut: 'एकनाथ शिंदे कडवट शिवसैनिक, फसवणूक करुन आमदारांना घेऊन गेले', संजय राऊतांचे टीकास्त्र

Sanjay Raut: 'एकनाथ शिंदे कडवट शिवसैनिक, फसवणूक करुन आमदारांना घेऊन गेले', संजय राऊतांचे टीकास्त्र

googlenewsNext

मुंबई: काल झालेल्या विधान परिषद निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांना घेऊन गुजरातला गेल्याची चर्चा आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'अनेक आमदार वर्षावर'
ते पुढे म्हणाले की, "काही आमदारांची नावे मीडियात आली, ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात आले. यात काही मंत्र्यांची नावेही होती. पण, ते सर्व वर्षावर आहेत. काही आमदारांशी संपर्क झाल्यावर समजले की, त्यांना या प्रकाराबद्दल काहीच माहिती नाही. त्यातील काही परत मुंबईकडे येत आहेत. तर काही सध्या सूरतमध्ये आहेत. त्यांची व्यवस्था गुजरात प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील करत आहेत. त्या आमदारांना तिकडेच का ठेवलं? यातून त्यांचे षडयंत्र दिसून येत आहे. फसवणूक करुन आमदारांना घेऊन गेले. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर आम्ही तुम्हाला अधिक माहिती देऊ," असंही ते म्हणाले.

संबंधित बातमी- 'राज्यात मध्यप्रदेश-राजस्थान पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न', संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

'गैरसमज दूर होतील'
"एकनाथ शिंदे कालपर्यंत आमच्यासोबत होते. सेनेचे उमेदवार विजयी व्हावे, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत होते. ते आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत, कडवत शिवसैनिक आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत जे बोलले जात आहे, ते चुकीचं आहे. जोपर्यंत त्यांच्याशी बोलणं होत नाही, तोपर्यंत मी यावर काही बोलणार नाही. मुख्यमंत्री अनेक खात्यांचा आढावा घेत असतात. पण, तरीदेखील काही गैरसमज झाले असतील, तर ते दूर होतील. आमचे सर्व सहकारी यावर बोलत आहोत, सर्वांशी चर्चा सुरू आहे. राजकारणात अशा प्रसंगांना सामोरे जावं लागतं. 

'एकनाथ शिंदे कडवट शिवसैनिक'
"अडीच वर्षांपूर्वी भाजपने अशाप्रकारचा प्रयत्न केला होता. आताही भाजप पाठीवर घाव घालत आहे, पण आम्ही छातीवर वार झेलणारे आहोत. भाजप एकनाथ शिंदे यांच्यामार्फत सरकार पाडण्याच डाव आखत आहे. पण, तो पूर्ण होणार नाही. शिंदे कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला आहे, अनेक घाव छातीवर झेलले आहेत. सध्या जे चित्र निर्णाण केलं जात आहे, भाजपचा डाव यशस्वी होणार नाही," असंही राऊत म्हणाले. 

Web Title: Eknath Shinde | Sanjay Raut | 'Eknath Shinde is true Shiv Sainik', says Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.