Eknath Shinde: 'शिवसेनेने कधीही श्रेयाचे राजकारण केले नाही', एकनाथ शिंदेंचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 09:33 PM2022-04-05T21:33:53+5:302022-04-05T21:34:02+5:30
बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, पण भाजप आणि शिवसेना यांच्यात श्रेयवाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाणे : शिवसेनेने कधीही श्रेयाचे राजकारण केलेले नाही, जे लोकांच्या हिताचा आहे, लोकांना या प्रकल्पातून फायदा होणार आहे ती ते काम शिवसेनेने केली आहेत आणि तेच काम आता महाविकास आघाडीचे सरकार करत असल्याचे मत नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्गदर्शनाखाली समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले, असेही त्यांनी या वेळी पुन्हा स्पष्ट केले. नागपूर ते शेलु या 210 किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्याचे लोकार्पण 1 मे अर्थात महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पहिला टप्पा हा पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे आणि दोनशे २१० किलोमीटर म्हणजे जवळपास मुंबई-पुणे एक्सप्रेस अडीच पट झाला आणि लोकांसाठी वापरण्यासाठी खुला करणे महत्त्वाचे आहे असल्याचे ही त्यांनी सांगितले.
'शिवसेना श्रेयवादात पडत नाही'
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली याचे काम सुरू झाले हे आम्ही नाकारत नाही मात्र त्या काळातही मी त्या खात्याचा मंत्री होतो आणि उद्धव ठाकरे यांनी देखील माझ्यावर विश्वास टाकला होता त्यानुसार या मार्गाचे काम सुरू करण्यात आले. मात्र असे असतानाही आम्ही त्यांचे श्रेय कुठेही नाकारत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, सगळ्यांच्या सहकार्यातून हा रस्ता झालेला असून तो रस्ता रेकॉर्ड ब्रेक टाईम वर्ल्ड क्लास झाला असेही ते म्हणाले.
आकसा पोटी चौकशी करण योग्य नाही
संजय राऊत यांच्यावर ईडीकडून झालेल्या करवाईबाबत त्यांना विचारले असता ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. जे दोषी असतील ज्यानी काही गैरप्रकार केले असतील तर त्यांची चौकशी करणे योग्य आहे. परंतु राजकीय भावनेपोटी राजकीय आकसापोटी अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करणे योग्य नाही तो लोकशाहीला घातक आहे असे त्यांनी म्हटले आहे.