Eknath Shinde Milind Narvekar Meeting: गेटबाहेर १० मिनिटं तर हॉटेलमध्ये ४५ मिनिटं... मिलिंद नार्वेकरांना शिंदेंनी तासभर ताटकळवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 06:25 PM2022-06-21T18:25:53+5:302022-06-21T18:27:12+5:30

शिवसेनेकडून ऑफर घेऊन चर्चेसाठी गेले होते मिलिंद नार्वेकर

Eknath Shinde Shivsena Milind Narvekar Meeting Waiting game Uddhav Thackeray Maharashtra Political Drama | Eknath Shinde Milind Narvekar Meeting: गेटबाहेर १० मिनिटं तर हॉटेलमध्ये ४५ मिनिटं... मिलिंद नार्वेकरांना शिंदेंनी तासभर ताटकळवलं!

Eknath Shinde Milind Narvekar Meeting: गेटबाहेर १० मिनिटं तर हॉटेलमध्ये ४५ मिनिटं... मिलिंद नार्वेकरांना शिंदेंनी तासभर ताटकळवलं!

googlenewsNext

Eknath Shinde Milind Narvekar Meeting: शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते आणि महाविकास आघाडी सरकारचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्यसभेत शिवसेनेचा आणि विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करत भाजपाने आपले सर्व उमेदवार निवडून आणले. या धक्क्यातून महाविकास आघाडी सावरत असताना एकनाथ शिंदे यांनी सुमारे ३०पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेत गुजरात गाठलं आणि बंडाचं निशाण फडकवलं. शिवसेनेत मिळणारी सापत्न वागणूक आणि महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचा असलेला वरचष्मा यावर नाराज असल्याने शिंदे यांनी हे बंड पुकारल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ऑफर घेऊन शिवसेनेचे दोन खास नेते सुरत मध्ये एकनाथ शिंदेंना भेटायला गेले. त्यावेळी मिलिंद नार्वेकर यांना भेटीसाठी एकनाथ शिंदे यांनी तब्बल तासभर ताटळकवले असं दिसून आले.

एकनाथ शिंदे कालच सुरतमध्ये दाखल झाले. त्यानंतर ते सुरतच्या ला मेरेडियन हॉटेलमध्ये आहेत. तेथे त्यांच्यासोबत सुरूवातील १०-१२ आमदार होते, मात्र आता त्यांच्यासोबत सुमारे ३५ आमदार असल्याचे बोलले जात आहे. अशा वेळी एकनाथ शिंदे यांनी नाराजी शमवण्यासाठी आणि त्यांना पुन्हा आणण्यासाठी मिलिंद नार्वेकर शिवसेनेकडून प्रस्ताव घेऊन चर्चेला सुरतला गेले होते. त्यावेळी मिलिंद नार्वेकर यांना तब्बल तासभर बाहेरच वाट पाहावी लागली. सुरूवातीला मिलिंद नार्वेकर यांची कार सुरक्षा कडे असलेल्या गेटवर तब्बल १० मिनिटं अडवण्यात आली. काही वेळाने त्यांना आतमध्ये सोडण्यात आले. पण त्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घडण्यासाठी त्यांना ४५ मिनिटं ताटकळावं लागलं.

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक आणि अतिशय विश्वासू असे सहकारी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणाला भेटावे, किती काळ वेळ द्यावा याबद्दलचा सल्ला नार्वेकर उद्धव यांना देतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ जी व्यक्ती इतरांना देते त्याच व्यक्तीला दुसऱ्या एका सहकाऱ्याला भेटण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागल्याने राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून आले.

दरम्यान, भाजपाचे आमदार संजय कुटे दोन तास आधीच सूरतला  पोहोचले होते. त्यांनी शिंदेंची भेट घेतली. त्यापूर्वी त्यांनाही पोलिसांनी हॉटेल पासून १०० मीटर अंतरावर अडविले होते. यानंतर फोनाफोनी झाल्यावर त्यांना आत सोडले होते. मिलिंद नार्वेकरांच्या देखील एकाच गाडीला आतमध्ये जाऊ देण्यात आले. अन्य चार गाड्या बाहेर ठेवण्यात आल्या. नार्वेकर पोलिसांना हाताने बाजुला होण्यास सांगत होते.  अखेर पोलिसांनी नार्वेकरांचीच गाडी आत सोडली.

Web Title: Eknath Shinde Shivsena Milind Narvekar Meeting Waiting game Uddhav Thackeray Maharashtra Political Drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.