एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का; १२ राज्यांच्या प्रमुखांचा मिळाला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 08:19 AM2022-09-16T08:19:43+5:302022-09-16T08:20:11+5:30
या सर्व राज्य प्रमुखांना त्यांच्या राज्यात पक्षवाढीसाठी सर्वतोपरी मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आश्वस्त केले.
मुंबई : शिवसेनेच्या विविध राज्यांतील १२ प्रदेश प्रमुखांनी बुधवारी नंदनवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी कॅप्टन अभिजित अडसूळ हेदेखील उपस्थित होते.
पाठिंबा दिलेल्यांमध्ये दिल्ली शिवसेना प्रदेश प्रमुख संदीप चौधरी, मणिपूर प्रदेश प्रमुख टोंबी सिंह, मध्य प्रदेश राज्य प्रमुख ठाडेश्वर महावर, छत्तीसगड प्रदेश प्रमुख धनंजय परिहार, गुजरात प्रदेश प्रमुख एस. आर. पाटील, राजस्थान प्रदेश प्रमुख लखनसिंह पवार, हैदराबाद प्रदेश प्रमुख मुरारी अण्णा, गोवा प्रदेश प्रमुख जितेश कामत, कर्नाटक प्रदेश प्रमुख कुमार ए. हकारी, पश्चिम बंगाल प्रदेश प्रमुख शांती दत्ता, ओडिशा प्रदेश प्रभारी ज्योतीश्री प्रसन्न कुमार आणि त्रिपुरा राज्याचे प्रदेश प्रभारी बरीवदेव नाथ अशा एकूण १२ राज्यातील प्रदेश प्रमुखांचा समावेश होता.
या सर्व राज्य प्रमुखांना त्यांच्या राज्यात पक्षवाढीसाठी सर्वतोपरी मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आश्वस्त केले. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.